*अपक्ष उमेदवार असतानाही विक्रांत आसबे ठरला लाडका भाऊ* *प्रभाग १२मधून  महिलांकडून "आपला माणूस" म्हणून  मिळत आहे  मोलाची साथ*

*अपक्ष उमेदवार असतानाही विक्रांत आसबे ठरला लाडका भाऊ* *प्रभाग १२मधून  महिलांकडून "आपला माणूस" म्हणून  मिळत आहे  मोलाची साथ*

पंढरपूर/प्रतिनिधी 

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीतील  प्रचार अंतिम टप्यात आला आहे. विविध प्रकारच्या प्रचारातून उमेदवारांकडून मतदान मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मात्र पंढरीतील प्रभाग क्रमांक १२मधील अपक्ष उमेदवार विक्रांत सज्जन  आसबे बद्दल लाडका भाऊची प्रतिमा झाल्यामुळे महिलांनी एकत्रित येत भक्कम पाठिंबा दिला आहे.
    विक्रांत आसबे हे अपक्ष उमेदवार असून ते याच प्रभाग क्रमांक १२मधील स्थानिक रहिवासी आहेत. त्यांनी निवडणुकीत उतरण्यापूर्वीच या प्रभागातील विकासाचे व्हिजन तयार करून ठेवले आहे. स्वतः उमेदवारी दाखल करण्याचा विचारही केला नव्हता. त्यावेळीही या प्रभागासाठी विकासाची दूरदृष्टी आणि याच भागातील उमेदवार मिळावा असे सुचविले होते. यामुळेच या प्रभागातील महिलांनी विक्रांत आसबे यांच्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन करून दाखविले आहे. या महिला एकजुटीने अपक्ष उमेदवार विक्रांत आसबे या लाडका भाऊसाठी   मोठे बळ मिळालं आहे.
       या प्रभागात विकास कामे न करताही परत उमेदवारी मागणे कितपत योग्य आहे? आपण या प्रभागात मतदार नसताना स्थानिक उमेदवारावर अन्याय का?या सर्व प्रकारचा  अभ्यास करून आपण या प्रभागातून अपक्ष उमेदवारी स्वीकारली आहे.  अशी प्रतिक्रिया  प्रभाग क्रमांक 12 ब चे अपक्ष उमेदवार विक्रांत सज्जन आसबे यांनी दिली आहे.
     पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत एकूण १८प्रभागातून ३६ उमेदवारसाठी मतदान होत आहे. एकूण सर्वच प्रभागातील परिस्थिती पाहता या प्रभाग क्रमांक १२मधील उमेदवार अधिक आहेत. त्यातही अपक्ष असणारे विक्रांत सज्जन आसबे यांचं अधिकच नशीब म्हणून की काय मतदान पत्रिकेत क्रमांक १वर नाव आले आहे. यामुळे अशिक्षित मतदार यांना भेटून प्रचार करीत समजावून सांगत असताना सोपे झाले आहे. ही एक जमेची बाजू विक्रांत आसबे यांच्यासाठी निर्माण झाली आहे.