*आ. राजू खरे यांनी सरकारला  करून दिली आश्वासनाची आठवण..!* *गोरगरिबांच्या घरकुलसाठी वाळू अन् अनेक मूलभूत समस्यावर उठविला आवाज* 

*आ. राजू खरे यांनी सरकारला  करून दिली आश्वासनाची आठवण..!*  *गोरगरिबांच्या घरकुलसाठी वाळू अन् अनेक मूलभूत समस्यावर उठविला आवाज* 

पंढरपूर/प्रतिनिधी 

 मोहोळ मतदारसंघातील घरकुल धारक यांना सरकारने मोफत वाळूचे आश्वासन दिले असून, त्याची अंमलबजावणी होत नाही.याबाबत सरकारला आठवण करून देत,शेतकरी व नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर आ राजू खरे यांनी सडेतोड भूमिका घेत आवाज उठविला आहे.यामुळे राज्यातील महसूल विभाग यापुढील काळात वाळूचा प्रश्न नक्की मिटवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

नागपूर येथील अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सभागृहात बोलताना महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण नियम आ.राजू खरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष यांचे निदर्शनास आणून दिला आहे.  
  शासकीय घरकुलासाठी शासनाकडून  वाळू मोफत देण्यात येते, परंतु मोहोळ विधानसभा मतदारसंघातील एकाही घरकुल धारकाला ही वाळू आजतागायत मिळालेली नाही.
या अनियमिततेवर तातडीने कार्यवाही करून संबंधित लाभार्थ्यांना तीन ब्रास वाळू मिळावी, अशी ठाम मागणी आ.खरे यांनी सभागृहात केली.

मोहोळ पंढरपूर मतदारसंघातील अत्यंत गंभीर समस्येकडे लक्ष वेधले असताना 
पाणंद रस्त्यांचा अभाव असल्याचे निदर्शनास आणले.देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे उलटली, तरीही मोहोळ मतदारसंघातील अनेक गावांना पानंद रस्ते उपलब्ध नाहीत. शेतापासून गावापर्यंत येण्यासाठी शेतकऱ्यांना गुडघाभर चिखलातून मार्ग काढावा लागतो. दळण-वळण, शेती विकास आणि दैनंदिन जीवनासाठी महत्त्वाचे असलेले पानंद रस्ते तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मंत्री महोदयांसमोर मांडली. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात ठेवलेल्या प्रस्तावाला मी पूर्ण पाठिंबा दर्शविला असल्याचे जाहीर केले. हा प्रस्ताव जनसामान्यांच्या हितासाठी अत्यंत आवश्यक व उपयुक्त आहे.

मोहोळ मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी माझा हा प्रयत्न असाच ठामपणे यापुढील काळातही सुरू राहील. असेही आ. राजू खरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे