*श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सचिन कांबळे यांचा सत्कार* *गाताडे प्लॉट परिसरातील लोन सेंटरचे वतीने झाला सत्कार
पंढरपूर/प्रतिनीधी
श्रमिक पत्रकार संघ पंढरपूरचे अध्यक्षपदी लोकमतचे पत्रकार सचिन कांबळे यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त जुना कराड नका परिसरातील गातांडे प्लॉट मधील लोन सेंटरचे वतीने सत्कार करण्यात आला.
हा सत्कार लोन सेंटरचे प्रशांत बाबर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लोन सेंटर मधील आण्णासाहेब लवटे, कुणाल खरात, सुमेध क्षीरसागर, अविनाश चांगभले, धनंजय जाधव, आणि दिगंबर अंबुरे सर पत्रकार महालिंग दुधाळ यांचेसह अनेकजण उपस्थित होते.