*आ. यशवंत माने यांच्या गावभेट दौऱ्यास चांगलाच प्रतिसाद* *मोहोळ मतदार पंढरपूर तालुक्यातून आज आणि उद्या दौरा*
पंढरपूर /प्रतिनिधी
मोहोळ राखीव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. यशवंत माने यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे मतदार संघातून आपला गावभेट सुरु ठेवला आहे. उत्तर सोलापूर भागातील आपला दौरा आटपून आज रविवार दि 27ऑक्टॉबर पासून सोमवार या दोन दिवसात पंढरपूर तालुक्यातील सर्व गावात गावभेट दौरा सुरु ठेवला आहे. या दौऱ्या दरम्यान आ माने यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आ. माने यांनी मतदार संघातील गावोगावी जावून, आपण मागील पंचवार्षिक मधून केलेल्या कोठ्यावधी रुपयेच्या विकासकामाची पावती म्हणून अजून एकदा संधी द्यावी.या मागणी साठी आपण आपल्याकडे आलो असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक गावातील जनतेला हा विकास दिसत आहे. यामुळेच आ.माने यांना अजून एकदा संधी मिळेल अशी आशादायक परिस्थिती दिसत आहे.
आ. यशवंत माने यांनी मागील पंचवार्षिक मधून गावोगावी विकास निधी दिला आहे. कोणत्याही गावच्या राजकारणात कसलाही सहभाग नोंदविला नव्हता. यामुळेच आ. माने हे सर्वसमावेशक उमेदवार म्हणून आपलेसे वाटत आहेत.
आ. यशवंत माने यांनी तालुक्यातील विविध गावात दौरा सुरू केला आहे. यामध्ये रविवारी कोंढारकी, चळे, आंबे, सरकोली, ओझेवाडी, नेपतगाव,आंबेचिंचोली,या गावात भेटी आहेत.
उद्या सोमवारी पुळुज, पूळुजवाडी, शंकरराव - नळी, विटे, पोहोरगाव, खरसोळी, तारापूर, मगरवाडी, फुलचिंचोली या गावातून गावभेट दौरा आयोजित करण्यात आला आहे.