*कसे करावे वंदन.... शाळेला जाणाऱ्या रस्त्याचे होईल का नंदनवन.....?* *न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थी-विद्यार्थिनी बरोबरच शिक्षक व पालकांचे आरोग्य आले धोक्यात* *शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींना या रस्त्यावरून करावी लागते मोठी कसरत*
करकंब /प्रतिनिधी
स्वातंत्र्याची पहाट झाली ....लोकशाही ला जाग आली.... गेली त्र्याहत्तर वर्ष झाली .प्रजासत्ताक दिन संपन्न साजरा करत असतो. या प्रजासत्ताक दिनानिमित्त आजही करकंब हे पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या गावात असलेल्या व सर्वच बाबतीत अग्रेसर असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी बरोबरच शाळेतील शिक्षकांना त्यातच पालक वर्गांना येताना जाताना रस्ता नसल्याने जो रस्ता आहे तो प्रचंड घाणीच्या साम्राज्यात त्यातच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अशातूनच विद्यार्थी विद्यार्थ्यांना या शिक्षणाच्या ज्ञान मंदिरात घाणीच्या दुर्गंधीचा प्रवेश घेऊन शिक्षण घेण्यासाठी जावे लागते .त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे व पालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असले तरी या परिसरातील नागरिकांना काय ज्यांच्यावर या प्रभागाची जबाबदारी आहे ,त्यांचंही दुर्लक्ष आहेच पण जे सत्ताधारी म्हणून आहेत तेही विरोधकांचा प्रभाग आहे.म्हणून कानाडोळा करून याकडे दुर्लक्ष करतात . तर प्रशालेचे ह्याबाबतीत दुर्लक्ष होते. ह्या बाबतीत सत्ताधारी आणि विरोधकांच्या या वादात नेमका शाळेला जाणाऱ्या रस्त्याचे नंदनवन होईल का? त्यातच चेतना विकास मंडळ संचलित असलेल्या या इंग्लिश स्कूल या रस्त्याबाबत विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक आणि पालकांची मोठी गैरसोय व आरोग्य धोक्यात आल्याचे पत्र ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले का? याबाबतीत प्रचंड उदासीनता अशा शाळेबाबत निर्माण झाली आहे. जर मुलांचे मुलींचे आरोग्य धोक्यात निर्माण असेल, जिथे शिक्षणाच्या ज्ञान मंदिरात जाण्यासाठी रस्तेच नीट नसतील तर मुलांच्या उज्ज्वल भविष्याचे काय? अशी चर्चा पालक वर्गातून होत असून ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देणे अत्यंत आवश्यक असल्याचे अनेक सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे.या ठिकाणी मुरमाची एखादी पाटी सुद्धा टाकण्याचेमोठे धाडस करण्याचं काम ना सत्ताधारी करतात ना विरोधक करतात ना प्रशाला करते.वंदन मात्र प्रजासत्ताक दिना च्या निमित्ताने दि. 26 जानेवारी या दिवशी मात्र होत असते . पण अशा ज्ञानमंदिरा ला जाणाऱ्या रस्त्यांचे नंदनवन कधी होणार? की लोकशाही च्या या प्रजासत्ताक दिनाला वंदन करून त्यामुळे ग्रामीण भागात आजही 73 वर्षे झाली .खऱ्या अर्थाने लोकशाही ग्रामीण भागात अशा विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालकांच्या मनात रुजवण्याचं काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे .याचे कोणतेही सोयरसुतक कुणालाही नाही. दरवर्षीप्रमाणे दि .15 ऑगस्ट आणि दिनांक 26 जानेवारीला मोठ्या थाटामाटाने वंदन केले जाते .पण या रस्त्याचे नंदनवन कधी होईल की नाही याची शाश्वती अद्याप कोणी देऊ शकत नाही.
न्यू इंग्लिश स्कूल या जाणारा नेमका रस्ता कोणता कारण याच रस्त्यावरून या इंग्लिश स्कूल प्रशालेच्या प्रांगणात 11 संजीवन समाधी स्थळ पैकी एक स्थळ,संत निवृत्ती महाराज पालखी तळ, पुरातन प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिर करकंब येथील अनेक भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी करकंब ग्रामस्थ बरोबरच विशेषता महिलांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.