*सोलापूर जिल्हा खो-खो संघाच्या  कर्णधारपदी वसंतराव काळे प्रशालेच्या साक्षी देठे ची निवड*

*सोलापूर जिल्हा खो-खो संघाच्या  कर्णधारपदी वसंतराव काळे प्रशालेच्या साक्षी देठे ची निवड*

पंढरपूर /प्रतिनिधी 

 धाराशिव येथे दिनांक 27 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या 50व्या सुवर्ण महोत्सवी मुले व कुमारी गटाच्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा कुमारी खोखो संघाच्या कर्णधारपदी वसंतराव काळे प्रशालेतील कल्याणराव काळे क्रीडा मंडळ वाडीकुरोली चे अष्टपैलू खेळाडू साक्षी देठे तिची निवड करण्यात आली.
 कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या  सोलापूर जिल्हा कुमारी संघाच्या स्पर्धा पूर्व शिबिराच्या समारोप प्रसंगी सोलापूर जिल्हा अमॅच्युअर  खो-खो असोसिएशनचे सचिव अजित संगवे यांनी तिच्या निवडीची घोषणा केली. सोलापूर जिल्हा कुमारी संघात कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लब वाडीकुरोली येथील अष्टपैलू खेळाडू स्नेहा लामकाने, कल्याणी लामकाने समृद्धी सुरवसे श्रावणी देठे यांची निवड झाली आहे.
 या सर्व खेळाडूंच्या सत्कार समारंभ वेळी कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष समाधान काळे, श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी, सोलापूर जिल्हा खो खो असोसिएशनचे तांत्रिक समिती सचिव  उमाकांत गायकवाड प्रशालेचे प्राचार्य संजय कुलकर्णी पालक अनिल लामकाने सोलापूर जिल्हा खो- खो संघाचे प्रशिक्षक अतुल जाधव  सहकारी समाधान काळे सहशिक्षक दशरथ काळे व खेळाडू उपस्थित होते.
 यावेळी कर्णधार, प्रशिक्षक व सर्व खेळाडूंचा सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या
 यावेळी बोलताना कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष समाधान काळे म्हणाले की सर्व खेळाडूंनी एक संघपणे जिद्द आणि चिकाटीने खेळ करून आपल्या सोलापूर जिल्ह्याला विजयी करण्यासाठी परिश्रम घ्यावे. खोखो खेळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना अनेक संधी उपलब्ध होत असून प्रशासकीय सेवेमध्ये खेळाडूंनी जावे यासाठी खेळाबरोबर अभ्यास करून परिश्रम घ्यावे.
असोसिएशनचे सचिव अजित सांगवे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना सांगितले की  सराव शिबिराच्या माध्यमातून सर्व सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंनी चांगले परिश्रम घेतले असून सोलापूर जिल्ह्याला प्रथम क्रमांक अजिंक्यपद मिळवण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावेत. कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबने अतिशय चांगले सराव शिबिर घेतल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.