*समाधान काळेसह काळे गटातील उमेदवारांचा भाजपमध्ये प्रवेश* *सर्व जागा जिंकून देण्याची भाजपला दिली हमी* *पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचेकडून ताकद देण्याचे आश्वासन
पंढरपूर/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार यांच्या गटाकडे असलेला काळे परिवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये समाधान काळे यांचेसह भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या उमेदवारांनी पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे.
वाडीकुरोली येथील मैदानात भाजप भाजपचे अनेक नेत्यांच्या उपस्थितीत हा जाहीर भाजप पक्ष प्रवेश करण्यात आला.यामध्ये वाखरी जिल्हा परिषद गटातून मोनिकाताई समाधान काळे, पटवर्धन कुरोली पंचायत समिती गणाचे उमेदवार प्रियंका रामकृष्ण नाईकनवरे, गोपाळपूर पंचायत समिती गणाच्या उमेदवार वंदना अण्णासाहेब शिंदे, भाळवणी जिल्हा परिषदेच्या उमेदवार जयश्री लोखंडे, उत्तम नाईकनवरे, जिगर गायकवाड यांचेसह काळे गटाचे अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात आ. अभिजीत पाटील यांच्याबद्दल बोलताना यश पचविता आले पाहिजे असा टोला लगावला. त्यांचा आणि विश्वासाचा कुठही पत्ता नाही. मी कसा काय लोकांना गंडवीत आहे . आशा अविर बाबा ते असल्याचेही यावेळी सांगितले. त्यांना आपलं एकच सांगणं आहे कुणाच्याही नादी लागा. पण देवाभाऊच्या नादी लागू नका. सुखाचा संसार चालू आहे , तो चालू ठेवा असा मोलाचा सल्लाही गोरे यांनी यावेळी दिला आहे.
यापूर्वी अनेक वेळा काळे यांनी पक्ष बदल केले असल्याच्या टीकाटिप्पणी होत असल्याचे आपणास दिसत आहे. परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेच लागतात असे सांगत काळे यांना हातभार दिला आहे. भाजपची आचारसंहिता पाळत काम करा पक्ष ताकद देईल असा ठाम विश्वासही गोरे यांनी यावेळी दिला आहे.
सरकार शिरोमणी चे चेअरमन कल्याणराव काळे यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना आपण सर्वांनी मिळून पंढरपूर तालुक्यातील भाजपच्या सर्वच्या सर्व जागा जिंकून दाखवू. असा निर्धार करीत, दोन पक्षाचे मालक होऊ पाहत असणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू. असे म्हणत आ. अभिजीत पाटील यांचे नाव न घेता टीका केली. सगळ्यांना फसवत आहेत राज्यातील नेत्यांनाही फसवण्याचे काम सुरू आहे त्यामुळे त्यांची जागा दाखवण्यासाठी आता आपल्याला सर्व जागा निवडून आणणे गरजेचे असल्याचेही कल्याणराव काळे यांनी यावेळी सांगितले आहे.
या भाजप पक्ष प्रवेशावेळी समाधान काळे, रणजितसिंह शिंदे, आमदार समाधान आवताडे, प्रशांतराव परिचारक यांनी मार्गदर्शन करीत या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत यश संपादन करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पांडुरंग परिवार , काळे परिवार, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.