“*९८ केंद्रप्रमुखांची नियुक्ती; सोलापूरच्या शिक्षण व्यवस्थेला नवे नेतृत्व!” नूतन शिक्षण सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या कारकिर्दीत लागला मुहूर्त* *पालकमंत्र्यांच्या हस्ते केले 98 जणांना नियुक्ती पत्रांचे वाटप*

“*९८ केंद्रप्रमुखांची नियुक्ती; सोलापूरच्या शिक्षण व्यवस्थेला नवे नेतृत्व!”  नूतन शिक्षण सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या कारकिर्दीत लागला मुहूर्त*  *पालकमंत्र्यांच्या हस्ते केले 98 जणांना नियुक्ती पत्रांचे वाटप*

सोलापूर, /प्रतिनिधी

— सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पात्र शिक्षकांना केंद्रप्रमुख पदोन्नतीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्याचा सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना .जयकुमार गोरे यांच्या हस्ते ९८ शिक्षकांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

या पदोन्नती प्रक्रियेत मराठी माध्यमातील ९२, उर्दू माध्यमातील ३ आणि दिव्यांग संवर्गातील ३ अशा एकूण ९८ शिक्षकांचा समावेश आहे. या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच शाळांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी केंद्रप्रमुखांची भूमिका अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सक्षम नेतृत्वाची गरज अधोरेखित केली. पदोन्नती मिळालेल्या केंद्रप्रमुखांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी आणि शैक्षणिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रामाणिकपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. शासन शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध असून विद्यार्थीकेंद्रित आणि गुणवत्ताधिष्ठित शिक्षण व्यवस्थेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. दिपक वैद्य, उपाध्यक्ष श्री. इंद्रजित पवार, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मा. रामप्पाजी चिवडशेट्टी, समाजकल्याण समिती सभापती सौ. संस्कृतीताई सातपुते, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. अमृताताई वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशल जैन, जिल्हा परिषद सदस्य श्री. आदिनाथ देशमुख व श्री. बालाजी नरोटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) श्री. चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सौ. स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री. सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सौ. मीनाक्षी वाकडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. कादर शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. सतीश कोपरवाड, कार्यकारी अभियंता श्री. नरेंद्र खराडे तसेच जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी पदोन्नती मिळालेल्या सर्व केंद्रप्रमुखांचे अभिनंदन करण्यात आले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक प्रशासन अधिक कार्यक्षम होऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्दिष्टाला नवी गती मिळेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष तथा सोलपुर जिल्हा शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केला.