*भाटघर व उजनी धरणाच्या डावा व उजवा कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील मायनर व तलाव भरून मिळावेत* *पंढरीच्या नगराध्यक्षा,डॉ.प्रणिता भालके यांची शेतकऱ्यासमवेत प्रांताधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी*
पंढरपूर, /प्रतिनिधी
*भाटघर व उजनी धरणाच्या डावा व उजवा कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील सर्व मायनर व तलाव तातडीने भरून देण्यात यावेत, या मागणीसाठी लोकनेते आमदार भारतनाना भालके फौंडेशनच्या वतीने नगराध्यक्षा डॉ.प्रणिता भालके यांनी प्रांतअधिकारी सचिन इथापे यांना तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेत निवेदन दिले. यावेळी मागणीची तत्काळ दखल घेत तलाव भरून घेणेसाठी प्रयत्न करू .असे आश्वासनही शिष्टमंडळाला दिले आहे.
*पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने उजनी व भाटघर धरण पुर्ण क्षमतेने भरलेले आहे. परंतू पंढरपूर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने ओढे, नाले, तलाव व कुपनलिका इ.कोरडे पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा शेती सिंचनाचा,पिण्याचा पाण्याचा तसेच जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. पंढरपूर तालुक्यातील रांजणी, अनवली,कासेगांव,शिरगाव, नेपतगांव, ओझेवाडी व इतर तलाव यांना उजनी धरणाच्या डावा व उजवा कालव्यावरील विविध मायनरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या अनेक तलावांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असून काही तलाव पूर्णपणे कोरडे पडलेले आहेत. उजनी व भाटघर धरणाच्या डावा व उजवा कालव्यावरून संबंधित मायनरद्वारे परिसरातील सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास शेतकऱ्यांचा शेती सिंचनाचा,पिण्याचा पाण्याचा तसेच जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे असे नगरअध्यक्षा डॉ.प्रणिता भगीरथ भालके यांनी निवेदनात म्हणले आहे*
यावेळी संभाजी कांबळे, दादासो ढोले, मारुती भाकरे, सुखदेव घाटुळ, विजय ढोले, अतुल फरकंडे, विलास शिंदे, विजय ढोले, लखन सुर्यवंशी, बापुसो भोसले, कपील कोरके, दाजीसो देशमुख, अंकुश डांगे, धनाजी कळकुंबे, पांडूरंग भुसे, सदाशिव जाधव,सुधाकर शिंदे उपस्थित होते.