*_सौ. रुक्मिणी तळेकर यांचे निधन_*

*_सौ. रुक्मिणी तळेकर यांचे निधन_*

पंढरपूर:-प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील, सौ रुक्मिणी दिगंबर तळेकर यांचे नुकतेच निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. भोसे येथील श्री जानुबाई देवी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, विलास दिगंबर तळेकर यांच्या त्या मातोश्री होत्या. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या रुक्मिणी तळेकर या गेल्या काही दिवसापासून अल्पशा आजाराने त्रस्त होत्या. मंगळवार दि.३.१० वाजता  राहत्या घरीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकस्मात मृत्यूने भोसे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.