*आ. बाबासाहेब पाटील यांनी केला प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांचा सन्मान*!
!पंढरपूर/प्रतिनिधी
अहमदपूर चाकुर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील हे पंढरीत दर्शनासाठी आले असता, त्यांनी राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांचे अभिनंदन करून सत्कार केला.
गुरुवारी सायंकाळी चार वाजता आ. बाबासाहेब पाटील हे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत आले होते. त्यांनी नागेशदादा फाटे यांच्या संपर्क कार्यालय येथे भेट दिली . यावेळी सहकार शिरोमणी साखर कारखाना निवडणुकीत संचालकपदी नागेशदादा फाटे यांची निवड झाल्याने सत्कार आणि अभिनंदन केले. तर आपल्या एन. पी कन्स्ट्रक्शन आणि श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या वतीनेही प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांनीही आ. पाटील यांचा यथोचित सन्मान केला.
यावेळी एन.पी.कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापक निवृत्ती पाटील, बँकेचे व्यवस्थापक संग्राम कापसे, संचालक डॉ रमेश फाटे, विनय शिंदे, विकास घाडगे, यांच्यासह कार्यकर्ते आणि कर्मचारी उपस्थित होते.