*खेडभोसे विद्यालयामध्ये वह्या व मास्क चे मोफत वाटप*

*खेडभोसे विद्यालयामध्ये वह्या व मास्क चे मोफत वाटप*


पंढरपुर/प्रतिनिधी

पंढरपुर तालुक्यातील खेडभोसे विद्यालय खेडभोसे मध्ये, खेडभोसे गावचे मा डेप्यु सरपंच व दत्त दूध संकलन केंद्र खेडभोसे चे चेअरमन पै. सिध्देश्वर देविदास पवार यांचे अथक प्रयत्नातून हिंदुस्थान फिडस प्रा. लि.कंपनी, बारामती यांचे मार्फत सी.आर.एस.फंडातून इयत्ता 5 वी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना व जि.प.प्राथ. शाळा खेडभोसे सर्व विद्यार्थ्यांना स्कायरबुक वह्या व मास्क चे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कुंडलिक पवार सर होते,प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दिलीप पवार साहेब ( मॅनेंजर, य.पा.पतसंस्था), श्री. पांडुरंग पवार ( आबा) मा.डेप्यु. सरपंच, कल्याण पवार ( चेअरमन, वि.से.सोसायटी), श्री. सुरेश पवार ( मा.डेप्यु. सरपंच), डाॅ. राजेंद्र जमदाडे ( डेप्यु. सरपंच),संतोष पवार ( आबा) प्रगतशील बागायतदार, श्री. पोपट पवार ( ग्रा.पं.सदस्य),श्री. सिध्देश्वर पाटील ( मा.डेप्यु सरपंच),
इ. समाजसेवी व शिक्षणप्रेमी मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे खेडभोसे विद्यालयास नेहमीच सहकार्य असतेच. वरील सर्व मान्यवरांनी व कंपनी चे पदाधिकारी श्री.डाॅ. बोराडे साहेब, क्षीरसागर साहेब व शेलार साहेब यांचे उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना वह्या व मास्क चे मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.डेप्यु. सरपंच पै. सिध्देश्वर पवार यांनी केले. हिंदुस्थान फिडस प्रा लि कंपनी  कडे सतत पाठपुरावा करून निधी कसा आणला हे सांगितले व विद्यालयाच्या कामकाजाबद्दल मुख्याध्यापक व सर्व स्टाफ चे कौतुक केले. त्यानंतर मा.डेप्यु. सरपंच पांडुरंग दत्तात्रय पवार ( आबा) यांनी विद्यालयाच्या नेत्रदीपक यशाबद्दल गौरव उद्गगार काढले.या विद्यालयातून अनेक विद्यार्थी डाॅक्टर, इंजिनिअर, अधिकारी झाल्याचे सांगून संस्थापक अध्यक्ष तानाजीराव पवार सर, मुख्याध्यापक, सर्व स्टाफ यांचे अभिनंदन केले.इथून पुढेही विद्यालयास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विद्यालयातर्फे सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ए.जी.भोसले सर यांनी केले व आभार श्री. बी.व्ही.झांबरे सर यांनी मानले.