*करकंब येथील शिवरत्न सामाजिक व सांस्कृतिक संस्था व अभिनव गणेश तरुण मंडळाने स्वच्छता.... आणि.. लेकीचं झाडा... चा केला जागर....!* *जागर स्वच्छता टीम व करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमला करकंब मधील गणेश मंडळांचे अनमोल सहकार्य* *शिवरत्न सामाजिक व सांस्कृतिक संस्था, थोरली वेस, अभिनव गणेश तरुण मंडळ करकंब यांचे स्वच्छतेसाठी व पर्यावरणासाठी योगदान* *राज्यात निर्माण होतोय आगळा - वेगळा आदर्श पॅटर्न*.

*करकंब/ प्रतिनिधी:

-करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम व जागर स्वच्छता अभियान टीम करकंब यांच्या सामाजिक क्षेत्रातील पर्यावरण व स्वच्छता अभियान टीमला करकंब मधील शिवरत्न सामाजिक व सांस्कृतिक संस्था,थोरली वेस करकंब व अभिनव गणेश तरुण मंडळ टिळक चौक करकंब .या दोन्ही गणेश मंडळांनी करकंब गावच्या लेकीचं झाड टीमच्या व जागर स्वच्छता टीमच्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन्ही मंडळानी १५०००/-रुपयाचे झाडांसाठी आर्थिक योगदान दिले,तसेच जागर स्वच्छता अभियान टीमने टाकाऊ पासून टिकाऊ डस्टबीन साठी उपयोगी पडतील या भावनेतून १०० रिकामे तेलाचे डबे गोळा केले होते,त्या डंब्यांना शिवरत्न सामाजिक व सांस्कृतिक संस्थेने रंगवून व नाव टाकून वस्तू रुपाने सहकार्य केले. शिवरत्न सामाजिक व सांस्कृतिक संस्था गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रासाठी मोठे योगदान देत आहे .* *त्यामध्ये रक्तदान शिबिर,मुलांना दत्तक घेणे, विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करीत असताना,एक झाडांसाठी व स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या  आगळ्यावेगळ्या उपक्रमाला गणेश मंडळाने केलेले योगदान भविष्यात दोन्ही टीमला प्रेरणादायी असून या कामासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम केले तर निश्चितच भविष्यात करकंब नाव पर्यावरण व स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर राहील .शिवरत्न सांस्कृतिक व सामाजिक संस्था या जागर स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आणि लेकीचे झाड या उपक्रमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून उदात्त हेतूने गावभर स्वच्छता आणि लेकीचा झाडाचा जागर केला .भविष्यात निश्चितपणाने या उपक्रमाचा राज्यात एक वेगळा आदर्श पॅटर्न निर्माण होईल. यावेळी अभिनव गणेश मंडळ व शिवरत्न  सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष ,पदाधिकारी , सभासद करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम व जागर स्वच्छता टीमच्या वतीने मनापासून यांचे मनापासून आभार मानले. पुढील काळातही काहीही योगदान लागले तर निश्चितच दिले जाईल असे यावेळी सांगितले.यावेळी शिवरत्न  सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे सर्व सभासद व करकंब गावच्या लेकीचं झाड टीम व जागर स्वच्छता टीम मोठ्या संख्येने उपस्थित होती*.