*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती (बार्डी) येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा*
करकंब/ प्रतिनिधी:
-बार्डी येथील
वाफळकरवस्ती येथे नवीन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थीनींच स्वागत हार गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.त्यानंतर महाराष्ट्र शासनानाच्या वतीने देण्यात आलेल्या मोफत गणवेश व पुस्तक वाटप करण्यात आले त्यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक वसेकर उपाध्यक्ष नितीन वसेकर,सदस्य हणमंत वसेकर,रामदास माळी,जयवंत वसेकर,माजी अध्यक्ष बिभीषण वसेकर,प्रमोद टेके,अरुण माळी,लक्ष्मण वसेकर,समाधान वसेकर,रमेश वसेकर,दीपक वसेकर,महिला विद्या वसेकर,पद्मिनी माळी,रूपाली माळी,अनिता वसेकर मुख्याध्यापक किरण ढोबळे,सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे,तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही शिक्षक सदैव तत्पर राहून काम करु सर्व पालकांच अनमोल सहकार्य मिळतेय पुढील काळात ही मिळाव असे ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले,फुलांची आणि फुगे लावून सजावट केल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली होती.