*ज्ञानदान जगातील सर्वोत्कृष्ट अलंकार-:माजी प्राचार्य यशवंत शिंदे* *अभ्यासाची आस आम्हाला ज्ञानाची कास धरू* *यशाचे शिखर गाठाया  पुस्तकाची गुढी ....!* *ज्ञानाची गुढी उभारून नवीन वर्ष साजरे*

*ज्ञानदान जगातील सर्वोत्कृष्ट अलंकार-:माजी प्राचार्य यशवंत शिंदे* *अभ्यासाची आस आम्हाला ज्ञानाची कास धरू* *यशाचे शिखर गाठाया  पुस्तकाची गुढी ....!* *ज्ञानाची गुढी उभारून नवीन वर्ष साजरे*


*करकंब /प्रतिनिधी*-

शिक्षक हे शाळा विद्यालय महाविद्यालय या माध्यमातून समाजातील तळागाळातील असलेल्या तसेच वंचित घटकांसाठी शिक्षणाच्या माध्यमातून तसेच वाचन संस्कृती आणि शिक्षणाच्या पलीकडे जाऊनही प्रत्येक वेळी शिक्षणाचे ज्ञान दान करणारा असल्याने ज्ञानदान हा जगातील सर्वोत्कृष्ट अलंकार असल्याचे मत संत सावता माळी विद्यालय अरण चे माजी प्राचार्य यशवंत शिंदे सर यांनी चेतना विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेत आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या पुस्तकाच्या गुढी (ज्ञानाची गुढी) उभारणीच्या कार्यक्रमाप्रसंगीव्यक्त केले.*

*चेतना विकास मंडळ* संचलित *न्यू इंग्लिश स्कूल
करकंब येथे भारतीय संस्कृतीने सांगितलेले नवीन वर्ष अर्थात गुढीपाडवा यानिमित्त प्रशालेमध्ये ज्ञानाची गुढी उभा करून भारतीय संस्कृतीचे नवीन वर्ष साजरे करण्यात आले .या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संत सावता माळी विद्यालय अरण चे माजी प्राचार्य  यशवंत शिंदे सर पत्रकार लक्ष्मण शिंदे संस्थेचे अध्यक्ष संजीव कुमार म्हेत्रे सर सचिव *देवकते सर पुणे डायट च्या माजी अधिकारी  लोहकरे मॅडम प्रशालेच्या मुख्याध्यापिका करमाळकर मॅडम*सुपरवायझर शिंदे मॅडम ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री बापू शिंदे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी प्रशालेने अनेक ऐतिहासिक पुस्तकांची गुढी करून गुढी च्या शिरपेचात भारतीय संविधान हा महान ग्रंथ मुकुट मनी म्हणून ठेवण्यात आला यावेळी पुढे बोलतानाआपले माजी प्राचार्य शिंदे यांनी माझ्या शालेय जीवनातील आजचा ज्ञानरूपी गुढी चा कार्यक्रम अविस्मरणीय व मनाला एक वेगळाच आनंद देणारा आहे अशी भावना व्यक्त करून अतिशय प्रेरणादायी अशा कार्यक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या.लोहकरे मॅडम यांनी ज्ञानाच्या गुढीतून सर्वांनी ज्ञानाचे अमृत प्राशन करून ज्ञानवंत किर्तीवंत जयवंत होण्याच्या शुभेच्छा दिल्या. व शाळेच्या या ज्ञान रुपी गुढी उभा करण्याचा जो संकल्प आहे तो अतिशय प्रेरणादायी असा आहे .अशा शुभेच्छा दिल्या .सुपरवायझर शिंदे मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन चव्हाण सर यांनी केला.