पक्षाच्या राज्य कार्यालयात उद्योग व व्यापार विभागाची बैठक संपन्न  *व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देणे हीच खरी आपली जबाबदारी* : आ. रोहित पवार* *उद्योग व व्यापार विभागाला नवी दिशा व नवे बळ देऊ*: *नागेश फाटे*

पक्षाच्या राज्य कार्यालयात उद्योग व व्यापार विभागाची बैठक संपन्न    *व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देणे हीच खरी आपली जबाबदारी* : आ. रोहित पवार*  *उद्योग व व्यापार विभागाला नवी दिशा व नवे बळ देऊ*: *नागेश फाटे*

पंढरपूर/प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षाचे युवा नेते, फ्रंटल सेल प्रमुख आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पार पडली.

या बैठकीत आ. रोहित पवार यांनी केवळ विभागाचा आढावा घेतला नाही, तर प्रत्येक पदाधिकाऱ्याला बोलण्याची संधी देत त्यांच्या भागातील व्यापारी व उद्योग समस्यांबाबत मनापासून ऐकून घेतल्या. प्रत्येक व्यापाऱ्यांच्या मनातील वेदना समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देणे हीच खरी आपली जबाबदारी आहे. या शब्दांत सर्वांना काम करण्याची नवी ऊर्जा दिली. लहान उद्योजकांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा संकल्प यावेळी आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला तसेच व्यापाऱ्यांच्या हक्कासाठी व समस्यांच्या निवारणासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची हमी दिली.

आगामी काळात विभागीय बैठकांद्वारे थेट व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न शासन दरबारी नेऊन निकाल लावण्याचे आपण युद्धपातळीवर प्रयत्न केले पाहिजेत असा सल्ला देत फक्त चर्चा नाही, तर कृतीतूनच आपला विभाग मजबूत होईल असे स्पष्ट शब्दांत सांगितले. 
यावेळी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी राज्याचा प्रमुख या नात्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने व्यापाऱ्यांशी व उद्योजकांशी थेट संवाद साधून लवकरच पुढील बैठकीचे आयोजन करू. तसेच आपल्या नेतृत्वात उद्योग व व्यापार विभागाला नवी दिशा व नवे बळ देऊ अशी ठाम ग्वाही दिली.

या बैठकीत प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते रविकांत वर्पे, उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव, विभागाचे राज्य कार्यकारिणी, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा.विजय काळे यांनी मानले.

या बैठकित फक्त चर्चा नव्हती, तर नव्या उर्जेचा संकल्प होती. व्यापाऱ्यांचा विश्वास जिंकण्याचा आणि उद्योग व व्यापार विभागाला बळकटी देण्याचा निर्धार होती. उद्योजकांच्या स्वप्नांना आकार देण्याचा आणि व्यापारी वर्गाला न्याय मिळवून देण्याचा नवा प्रवास होती असे मत फाटे यांनी व्यक्त केले.