*पंढरपूर तालुका लहुजी शक्ती सेनेच्या उपाध्यक्षपदी अनिल आडगळे व सदाशिव कसबे यांची निवड*

*पंढरपूर तालुका लहुजी शक्ती सेनेच्या उपाध्यक्षपदी अनिल आडगळे व सदाशिव कसबे यांची निवड*

पंढरपूर* प्रतिनिधी

लहुजी शक्ती सेनेच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी, 
भोसे येथील अनिल आडगळे व तारापूर येथील सदाशिव कसबे यांची निवड करण्यात आली. पंढरपूर येथील संत गाडगेबाबा धर्मशाळा येथे लहुजी शक्ती सेनेची बैठक संपन्न झाली. 
तालुकाध्यक्ष. जयसिंग मस्के यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवडी करण्यात आल्या. 
वरील निवडीनंतर  नंदकुमार पाटोळे यांची, शासकीय. कलावंत कमिटीवर निवड झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित. लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष. राहुल मस्के, संपर्कप्रमुख. मुकुंद घाडगे, जिल्हा सचिव. बापू घाडगे, युवक तालुकाध्यक्ष. समाधान वायदंडे, कलावंत आघाडी अध्यक्ष. आप्पा वाघमारे, युवा कार्यकर्ते. सुरज सकटे आदी उपस्थित होते.
यावेळेस नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन, लवकरच पंढरपूर तालुक्यात शाखा उद्घाटन व संघटनेचा भव्य असा मेळावा घेण्याचे ठरले आहे.