*भाळवणीच्या भवानीदेवी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ५ कोटी निधीची मागणी* *पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचे निवेदन*

*भाळवणीच्या भवानीदेवी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ५ कोटी निधीची मागणी* *पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचे निवेदन*

भाळवणी : प्रतिनिधी
         पंढरपूर. तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामदैवत श्री भवानीदेवी मंदिर हे पुरातन व ऐतिहासिक दैवत असून, भाविकांचा मोठा ओघ वर्षभर येथे असतो. नवरात्र उत्सव काळात सकाळ-संध्याकाळ मिळून दररोज ५०० ते ६०० भाविक दर्शनासाठी येतात, तर वर्षभरात सुमारे २ ते ३ लाख भाविक या मंदिराचे दर्शन घेतात. याशिवाय दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात यात्रा भरते.   
      नवरात्र उत्सवाच्या काळात दररोज विविध देवींचे धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा, छबीना व सांस्कृतिक कार्यक्रम असंख्य ग्रामस्थ, विशेषतः महिलांच्या उत्स्फूर्त सहभागातून संपन्न होतात. या उत्सवामुळे मंदिर परिसरात सामाजिक व धार्मिक वातावरण निर्माण होते.
       मात्र भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा व परिसराचा विकास झालेला नसल्याने मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ५ कोटी निधी पर्यटन खात्यातून मंजूर करावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुंबई येथे पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांना निवेदन सादर केले.
         भवानीदेवी मंदिर हे धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा असलेले ठिकाण असून येथे पर्यटन विकासाची मोठी संधी आहे. भाविकांना योग्य सुविधा, स्वच्छ परिसर, पायाभूत सोयी, प्रवेशद्वार, रस्ते, पार्किंग व वसतिगृह आदी सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असेही शिंदे यांनी निवेदनात नमूद केले.
        गेल्या काही वर्षांपासून ग्रामपंचायत व ग्रामस्थ सातत्याने मंदिर विकासाची मागणी करत असून, त्याला प्रतिसाद देत जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांनी आज मंत्रालयात जाऊन निवेदन दिले आहे. सदर निधी लवकरात लवकर मंजूर होऊन मंदिराचे सुशोभीकरण झाले तर भाविकांच्या सोयीसुविधा सुधारतील व भाळवणी गावाचे धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.