*राष्ट्रवादीच्या वतीने विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मान्यवरांचा सत्कार*

*राष्ट्रवादीच्या वतीने विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मान्यवरांचा सत्कार*

पंढरपूर/प्रतिनिधी
 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मान्यवरांचा प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. 
 
यामध्ये नेहा मोरे यांची पुणे येथील यूनोमिंदा कंपनीत ज्युनिअर इंजिनिअर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तसेच समृद्धी मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील १९ वयोगटातील मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावून सलग तिसऱ्यांदा विजय संपादन केल्याबद्दल तसेच डॉ. बालाजी हनुमंत बागल यांनी बी.ए.एम.एस डिग्री पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे,डॉ. रमेश फाटे, संजय पवार, माणिक मस्के, आजिनाथ मोरे, निवृत्ती भटकर, विनय शिंदे, ज्ञानेश्वर पवार, शुभम फाटे, शांतिनाथ पवार उपस्थित होते.