*प्रस्थापितांना आव्हान आणि जनतेला नवीन पर्याय देण्यासाठी निवडणूक रिंगणात*!  *पंढरपूर प्रभाग ६मधून इंजि निलेश जाधव यांची निवडणुकीची तयारी पक्की*

*प्रस्थापितांना आव्हान आणि जनतेला नवीन पर्याय देण्यासाठी निवडणूक रिंगणात*!    *पंढरपूर प्रभाग ६मधून इंजि निलेश जाधव यांची निवडणुकीची तयारी पक्की*

पंढरपूर/प्रतिनिधी 

पंढरीतील प्रभाग क्रमांक ६ मध्ये आजवरचा राजकीय इतिहास पाहता, कायम नगरसेवक पदासाठी प्रस्थापित मंडळींनीच आपले मस्तान कायमचे बसवले होते. मात्र त्यामधून सर्वसामान्य जनतेचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. यामुळेच आपण त्याच प्रस्थापितांना आव्हान देण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या मनातही आता बदल हवा असून यासाठी तिसरा पर्याय म्हणून  आपण या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय पक्का केला असल्याची माहिती इंजिनियर निलेश जाधव यांनी दिली आहे.

जनतेच्या आशीर्वादावरच  , पंढरीच्या सेवेसाठी प्रभाग क्रमांक सहा( अनुसूचित जाती राखीव)मधून लढणारच  असल्याचे मागील अनेक वर्षापासून युवक नेते निलेश जाधव यांनी जाहीर केले होते.
      पंढरपूर शहरामध्ये निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे.  पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.  येथे दहा तारखेपासून उमेदवारी  अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. प्रभाग क्रमांक सहा मधून समाजसेवक निलेश जाधव यांनी आपली उमेदवारी अंतिमता निश्चित केलेले आहे. यासाठी पक्ष सोबत असेल तर पक्षासोबत नाही तर जनतेच्या आशीर्वादावर अपक्ष म्हणून मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे . त्यामुळे उमेदवारी पक्की ठरली आहे.

       अभियांत्रिकी क्षेत्रात घेतलेले उच्चशिक्षण, प्रभागातील समस्यांचा असलेला अभ्यास,सर्व धर्मसमभाव मानून  सर्व धर्मियांचे सन उत्सव साजरे करणे, संपूर्ण प्रभागातील मतदारांचा सखोल अभ्यास, तळगातील जनतेपर्यंत असलेले नेटवर्क , तसेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे  यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख , शहरातील नगरपालिका ते मंत्रालय या प्रशासकीय कामांचा अनुभव या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
          प्रभाग क्रमांक ६ मधून निलेश जाधव यांनी उमेदवारी कायम ठेवल्यास प्रस्थापितांपुढे मोठे आव्हान निर्माण होणार आहे. कारण निलेश जाधव यांचा असणारा जनसंपर्क हा जिल्ह्याचे नेते प्रशांत प्ररिचारक , विठ्ठल चे माजी चेअरमन भगीरथदादा भालके यांना अवगत आहेच.
तसेच  प्रभागामध्ये परिवर्तन घडवून  सर्वसामान्य मतदार मलाच निवडून देतील असा ठाम विश्वास निलेश जाधव यांनी व्यक्त केला.