*जिल्हा परिषद. आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज* *सोलापूर जिल्ह्यातील निरीक्षकांसह सहनिरीक्षक नियुक्त*
*जिल्हा परिषद. आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज*
*सोलापूर जिल्ह्यातील निरीक्षकांसह सहनिरीक्षक नियुक्त
पंढरपूर /प्रतिनिधी
संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे वारे वाहू लागले आहेत. अशाच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने जिल्हा परिषदे आणि पंचायत समितीवर झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू केले आहेत. सुरुवातीचा पहिला टप्पा म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये निरीक्षकांसह सहनिरीक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अकलूज येथील शिवरत्न बंगला येथे बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या स्वाक्षरीने जिल्ह्यातील आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निरीक्षक आणि सहनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आल्या असल्याचे अधिकृत पत्र देण्यात आले आहे.
या करण्यात आलेल्या नियुक्तीमध्ये अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यासाठी निरीक्षक पदी राज्याचे माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे सर, सांगोल्याची निरीक्षक पदी आ.नारायणआबा पाटील, मंगळवेढा तालुका निरीक्षकपदी आ. उत्तमराव जानकर, उत्तर सोलापूर साठी मोहाचे आमदार राजू खरे तर बार्शी पंढरपूर साठी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांची निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील निरीक्षक यांना सहकार्य करण्यासाठी सहनिरीक्षकांची ही नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये सोलापूरचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे या दोघांची पंढरपूर आणि बार्शी तालुक्यासाठी साठी नियुक्ती करण्यात आली आहे. सुरज देशमुख व सौ विनंती कुलकर्णी यांची सांगोला तालुक्याच्या सहनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवेढा तालुक्यासाठी धनंजय साठे आणि शंकरराव बागल तर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट साठी सागर पडगळ आणि अरुण तोडकर यांची सहनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर सोलापूर साठी रवींद्र पाटील आणि रणजीत चवरे अशा नियुक्ती करण्यात आल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची व्यंगी तयारी सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे