*भाजप वैद्यकीय सेलच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी डॉ. विठ्ठल जाधव* *भाजपचे आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते केला सत्कार*
पंढरपूर/प्रतिनिधी
भाजपच्या वैद्यकीय सेलच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदावर सिद्धेवाडी तालुका पंढरपूर येथील डॉ. विठ्ठल जाधव यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा संयोजक डॉ. शरद शिर्के याचे अधिकृत पत्राद्वारे ही निवड झाली असून, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन डॉ. विठ्ठल जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
मकर संक्रांतीचे शुभ मुहूर्तावर सदरचे नियुक्ती पत्र देवून, भाजप पक्ष वाढविण्याची जबाबदारी वरिष्ठ पातळीवरून देण्यात आली आहे.
यावेळी सोमनाथ आवताडे, मारापूरचे सरपंच विनायक यादव, डॉ. गिरीष मासाळ, डॉ बेलदार, डॉ. नरळे, यांचेसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.