*निवडणूक संपताच वाखरी गटात जपली संस्कृती !* *उमेदवार मिस्टरानी भेटून दिल्या एकमेकांना शुभेच्छा*  *समाधान काळे यांना वाढदिवसानिमित्त संतोष बागल यांनी दिल्या शुभेच्छा* 

*निवडणूक संपताच वाखरी गटात जपली संस्कृती !*  *उमेदवार मिस्टरानी भेटून दिल्या एकमेकांना शुभेच्छा*   *समाधान काळे यांना वाढदिवसानिमित्त संतोष बागल यांनी दिल्या शुभेच्छा* 

पंढरपूर /प्रतिनिधी 

पंढरपूर तालुक्यांमध्ये विठ्ठल परिवारात फूट पडून मोठी वितुष्टता निर्माण झाली होती. त्यातल्या त्यात वाखरी गटाची निवडणूक अतिशय चुरशीची बनली होती. मात्र ही निवडणूक संपतात. या गटाचे विजयी महिला उमेदवार मयुरी बागल यांचे पती संतोष बागल यांनी आपली संस्कृती जपत आपण सारे एकच आहोत. हा नारा देत, चक्क मतमोजणीचे दुसऱ्या दिवशी पराभूत उमेदवार मोनिकाताई काळे यांचे पती युवा नेते समाधान काळे यांच्या वाढदिवसानिमित्त  थेट वाडीकुरोली येथे जाऊन, थेट सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.

वरील दोन्ही उमेदवार हे विठ्ठल परिवारातील आहेत. या निवडणुकीत उमेदवारीवरून फूट पडून वेगवेगळे झाले होते.
राजकारणाच्या वेळी राजकारण ,मात्र एकदा निवडणूक संपली की विरोधक व त्यांच्यासोबतचे मतभेद देखील बाजूला घ्यायचे असतात .या कृतीतून  बागल यांनी दाखवले. त्यामुळे 
समाधान काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या . यामुळे एक सुखद धक्का वाखरी जिल्हा परिषद गटातील व पंढरपूर तालुक्यातील लोकांना दिला आहे.
 यावेळी  हणमंत पाटील, विकास बागल, अतुल काळे , सोनु गायकवाड यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.