*पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी फोडला प्रचाराचा नारळ* *शिक्षक मतदार संघात प्रचारात आघाडी*
पंढरपूर/प्रतिनिधी
पुणे विभाग शिक्षक मतदार संघामधून 2014 ते 2020 या काळात अपक्ष निवडून आलेले माजी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी पंढरपूर येथील नामदेव पायरी येथे आपल्या प्रचाराचा नारळ फोडला.

पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
महायुती व महाविकास आघाडी यांचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत.
मात्र सावंत यांनी याआधीच आपल्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचारात आघाडी घेतली आहे.
1997 सालापासून सावंत हे शिक्षण चळवळीत सक्रिय आहेत.
शिक्षकांसाठी केलेल्या कामाच्या बळावरच 2014 साली ते तत्कालीन काँग्रेस व भाजपच्या उमेदवाराला पराभूत करून अपक्ष म्हणून निवडून आले होते.
2020 साली अपक्ष म्हणूनच त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला, त्या पराभवाचे सल भरून काढण्यासाठी सावंत यांचे हजारो कार्यकर्ते पुणे विभाग शिक्षक मतदार संघात सक्रिय झाले असून, त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.
आपण यावर्षी अपक्ष न लढता राजकीय पक्षाचे उमेदवार असू अशी भूमिका यावेळी सावंत यांनी घेतली आहे, कुठलाही राजकीय पक्ष माझ्यापासून दूर नाहीत, व मी कोणत्याही पक्षापासून दूर नाही, अशी भूमिका घेऊन सावंत यांनी महायुतीकडून लढण्याचे संकेत दिले आहेत.
पक्षाची उमेदवारी जाहीर होण्याआधीच सावंत यांनी 58 तालुक्याचे दौरे केले आहेत.
प्रमुख कार्यकर्त्यांना व शिक्षकांना विश्वासात घेऊन येणाऱ्या दोन दिवसात आपण राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले..