*युवराज पाटील यांचा निरोप न आल्याने आता आम्हालाही प्रचाराची तयारी करावी लागली* *आम्ही कामगार आणि कार्यकर्ते यांच्या गैरसमजातून झालो आहोत मुक्त*  *चेअरमन कल्याणराव काळे यांचा पत्रकार परिषदेत खुलासा*

*युवराज पाटील यांचा निरोप न आल्याने आता आम्हालाही प्रचाराची तयारी करावी लागली*  *आम्ही कामगार आणि कार्यकर्ते यांच्या गैरसमजातून झालो आहोत मुक्त*   *चेअरमन कल्याणराव काळे यांचा पत्रकार परिषदेत खुलासा*

पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवाराच्या दृष्टीने महत्वाची असलेल्या श्री विठ्ठल सह साखर कारखान्याची निवडणूक विठ्ठल परिवाराने एकत्रित येऊन पार पाडावी अशी अपेक्षा होती. त्यासाठी आपण मागील तीन महिन्यापासून प्रयत्न सुरू होते. त्याला यशही मिळाले होते, परंतु मागील दोन दिवसापर्यंत युवराज पाटील यांनी याबाबत कसलेही सकारात्मक उत्तर आणि निरोप न दिल्यामुळे शेवटी या निवडणुकीसाठी तयारी करणे भाग पडले आहे. असा खुलासा चेअरमन कल्याणराव काळे यांनी केला आहे.
  केवळ विठ्ठलची निवडणूक न पाहता आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सर्व एकसंघ विट्ठल परिवार राहून अनेक कार्यकर्त्यांना यामध्ये संधी देता आली असती. यामुळे मी स्वतः अनेकदा प्रयत्न केल्याचेही काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
    यावेळी बोलताना काळे यांनी सांगितले की, विठ्ठलच्या सभासदांच्या इच्छेखातर आपण वरील प्रयत्न केले असून युवराज पाटील यांच्या सर्व अटी मान्य करूनही त्यांनी जो निर्णय बदलला आहे. त्याबद्दल सभासदातून आता आमच्याबद्दल चांगली प्रतिक्रिया येत असल्याचा आशावादही काळे यांनी व्यक्त केला आहे.
     सध्या कामगार वर्ग नाराज झाला होता आशा चर्चा चालू होत्या, त्यासाठी आम्ही सर्व कामगार आणि कार्यकर्ते याची गटनिहाय बैठक घेऊन त्यांचा झालेला गैरसमज दूर करण्यात आम्हाला यश मिळाले असून आमच्या पाठीशी उभा राहतील असेही सांगितले.
आमच्या सोबत मनसे नेते दिलीप धोत्रे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष ऍड राजाभाऊ भादुले असे नेते असून उद्या रविवारी राजणी येथून प्रचार शुभारंभ करण्यात येत असूनगावोगावचे दौरेही सुरू करणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
  यावेळी विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके, मनसे चे दिलिप धोत्रे आणि काळे भालके गटाचे काही पदाधिकारी उपस्थित होते.