देशाच्या व राज्याच्या विकासामध्ये  गुणवंतांचा खूप मोठा वाटा -:  आ.आवताडे 

देशाच्या व राज्याच्या विकासामध्ये  गुणवंतांचा खूप मोठा वाटा -:  आ.आवताडे 

पंढरपूर : प्रतिनिधी

 देशाच्या  आणि राज्याच्या विकासामध्ये गुणवंताचाही मोठा वाटा आहेच, त्यामुळे गरीब परिस्थितीतून  मार्ग काढत  यशाला गवसणी घालणाऱ्या गुणवंतांचा मला सार्थ अभिमान आहे.असे प्रतिपादन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.
        सरकोली येथील सोमनाथ नंदकुमार माळी यांची इस्रो मध्ये शास्त्रज्ञ पदावर निवड झाल्याबद्दल,  आ. समाधान दादा अवताडे यांनी दामाजी कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळ सोबत सन्मानपूर्वक सत्कार केला व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.  यावेळी  दामाजी कारखान्याचे संचालक विजय माने ,राजेंद्र पाटील, राजेंद्र सुरवसे ,बसवेश्वर पाटील, सुरेश भाकरे , प्रमोद कुमार म्हमाने, व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी, भारत निकम, लक्ष्मण नरूटे, सचिन शिवशरण, दिलीप बापू भोसले ,मारुती थोरबोले, आबा भुजंगराव आसबे, कारखान्याची कार्यकारी संचालक झुंजारराव आसबे,  राजू बाबर ,अशोक केदार, आदी मान्यवर व कारखान्याचे खातेप्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.