*छावा संघटनेच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी गीतांजली कदम यांची निवड*
पंढरपूर /प्रतिनिधी
छावा संघटनेच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी गीतांजली कदम यांची निवड करण्यात आली. छावा संघटनेच्या महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष महालक्षमी सगर यांच्याकडून ही निवड घोषित करण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील महिलांनी त्यांच्या निवडीचे जोरदार स्वागत केले.
रविवार दि. ५ जून २०२२ रोजी छावा संघटनेच्या महिला नेत्या महालक्षमी सगर या पंढरपूरमध्ये आल्या होत्या. येथील महिला वर्गाच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या. यावेळी पंढरपूरमधील अनेक महिला उपस्थित होत्या.
छावा संघटनेच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी येथील गीतांजली कदम यांची निवड यावेळी सगर यांनी घोषित केली. गीतांजली कदम यांना निवडीचे पत्रही प्रदान करण्यात आले. गीतांजली कदम या पंढरपूरमधील सामाजिक कार्यकर्त्या असून, बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम केले आहे. अनेक महिलांचे संसार उभा करण्यात त्यांचा मोठा हातभार लागला आहे. गेल्या अनेक वर्षापासून छावा संघटनेत त्या कार्यरत होत्या. यामुळेच महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली असल्याचे महिला नेत्या महालक्ष्मी सगर यांनी सांगितले.
निवडीचे पत्र देऊन गीतांजली कदम यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर अनेक महिलांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छाही दिल्या. यावेळी रतन टिंगरे, राधा पोपळगट, सविता रणदिवे, पूजा बेंद्रे, पूजा निकम लक्ष्मी निकम , अलका कांबळे भारती पोपळगट, वंदना कांबळे इत्यादी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या निवडीमुळे पंढरपूर परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे.