*करकंब येथे महात्मा आनंद स्वामी सरस्वती जन्मोत्सव साजरा...!* *शिष्यवृत्तीचे वाटप*
करकंब /प्रतिनिधी:-
येथील डी ए व्ही महात्मा आनंद स्वामी सरस्वती आर्ट/सायन्स ज्यु.काॅलेज व रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंब यांच्या वतीने महात्मा आनंद स्वामी सरस्वती यांचा 140वा जन्मोत्सव दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रामभाऊ जोशी हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी स्व. रुक्मिणीताई आरोळे शिष्यवृत्तीचे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष सेंट्रल बँकेचे कृषी अधिकारी अमित बेंबळकर यांच्या हस्ते डी ए व्ही कॉलेज करकंब येथे शिक्षण घेत असलेल्या
1) पायल पांडुरंग जाधव
2) साक्षी सुहास गायकवाड
3) सलोनी समाधान चंदनशिवे
4) पूजा लक्ष्मण गायकवाड
5) प्रतीक्षा आनंद आरसुले
6) शोभा पांडुरंग इरकल
यांना स्व. रुक्मिणीताई आरोळे शिष्यवृत्ती धोंगडे व आरोळे परिवाराच्या वतीने प्रत्येकी दोन हजार रुपये शिष्यवृत्ति वाटप करून महात्मा आनंद स्वामी सरस्वती यांचा 140 वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. अमित बेबंळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, स्वर्गीय रुक्मिणी ताई आरोळे शिष्यवृत्तीबद्दल माहिती देऊन मुलींनी जास्तीत जास्त उच्च शिक्षण घेऊन आपला व आपल्या परिवाराचा विकास करावा, मुलींच्या उच्च शिक्षणामुळे दोन्ही घरचा विकास होतो, व भविष्यात जास्तीत जास्त गरजू मुलींना आर्थिक सहाय्य करू असे आश्वासन दिले यावेळी प्राचार्य हेमंत कदम यांनी महात्मा आनंद स्वामी सरस्वती यांच्या जीवनावर आधारित करकंब येथील प्रशालेस 1962 साली दिलेली भेट, प्रशालेचे जुनी इमारतीस भेट,मुलींचे शिक्षण,गायत्री मंत्रांचा उपासक विविध आंदोलने इत्यादीची माहीती सांगीतली. व 1962 साली जुनी इमारत मधील सलग दोन दिवस गायत्री मंत्र याच्यावर हॉलमध्ये महात्माजींनी प्रवचन केले होते त्यांची आठवण म्हणून त्या हॉलमध्ये सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तेल चित्राचे अनावरण करण्यात आले,
यावेळी शालेय शैक्षणिक सल्लागार समितीचे श्री.बाबुराव( आण्णा) जाधव, श्री. संजय मोहिते , श्री.मारुती व्यवहारे , पर्यवेक्षक श्री धनवंत करळे , रामभाऊ जोशी हायस्कूल व डी ए व्ही महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्युनिअर कॉलेज करकंब चा संपूर्ण स्टाफ व विद्यार्थिनी विद्यार्थी उपस्थितीत होते
प्रशालेचे पर्यवेक्षक धनवंत करळे यांनी आभार मानले.