*भावी आमदार- रणजितसिंह शिंदे यांचा अचानकपणे गाव भेट दौऱ्याने मतदार संघात चर्चेला उधाण.....!* *माढा- पंढरपूर मतदार संघात युवकांमध्ये अभिजीत पाटलांची वाढतीय क्रेझ.*

*भावी आमदार- रणजितसिंह शिंदे यांचा अचानकपणे गाव भेट दौऱ्याने मतदार संघात चर्चेला उधाण.....!*   *माढा- पंढरपूर मतदार संघात युवकांमध्ये अभिजीत पाटलांची वाढतीय क्रेझ.*

.*करकंब प्रतिनिधी. :- 

गेल्या काही दिवसापासून सोलापूर दूध संघाचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य-रणजीत सिंह बबनराव शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माढा -पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भावी आमदार म्हणून रणजीतसिंह शिंदे यांचे फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हयरल झाले होते. त्याच अनुषंगाने नुकतेच मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार- राजन पाटील यांनीही रणजीत सिंह शिंदे या माढा - पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करणार असल्याचे सुतोवाच केले होते.


       माढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघात अचानकपणे रणजीत सिंह शिंदे यांनी जळोली,उंबरे, करोळे, कान्हापुरी, गुरसाळे, सुस्ते आदींसह माढा विधानसभा मतदार संघातील 42 गावास गाव भेट दौरा सुरू केल्याने अनेकांना याचा आश्चर्याचा धक्का बसला आहे तर याबाबत गावा - गावात, खेड्या- खेड्यात आणि वाड्या - वस्त्यावर व चावडीवर अचानक पणाच्या गाव भेट दौऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वी गेल्या  दोन- तीन वर्षात रणजीत सिंह शिंदे यांचे या माढा - पंढरपूर मतदार संघात गावभेट दौरे का झाले नाहीत...? याबाबतची ही चर्चा सुरू आहे. याच माढा -पंढरपूर मतदार संघात श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन-अभिजीत आबा पाटील हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असल्याने की काय म्हणून हे रणजितसिंह शिंदे यांचे गाव भेट दौरे अचानक सुरू असल्याचे बोलले जात आहे.
             त्यातच श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन- अभिजीत आबा पाटील यांची या माढा पंढरपूर मतदार संघात सर्वसामान्यांबरोबर बरोबरच युवकांमध्ये ही प्रचंड वाढती क्रेझ निर्माण झाली असल्याने तसेच जनतेशी व युवकांशी सतत गाठी भेटी मध्ये सातत्य आहे. आगामी होणाऱ्या माढा- पंढरपूर विधानसभा मतदारसंघात आत्तापासूनच सोलापूर जिल्हा दूध  संघाचे चेअरमन- रणजितसिंह शिंदे यांनी गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने लोकांशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न सुरू केला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.