*डॉ.राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जयंती व शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व अधिकारी यांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने भव्य जंगी सत्कार* 

*डॉ.राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जयंती व शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व अधिकारी यांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने भव्य जंगी सत्कार* 

लातूर:-प्रतिनिधी
 दिनांक:-05 सप्टेंबर 2021 रोजी डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जयंती व शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने शिक्षण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष श्री माधव कोळगावे सर होते.या कार्यक्रमात राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या प्रतिमेस व महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटतात हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या सर्व शिक्षकांना राष्ट्रीय ओबीसी महासंघ व युवा महासंघाच्या वतीने शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन शिक्षकांचा जंगी सत्कार प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उस्मानाबाद डायटचे प्राचार्य श्री बळीराम चौरे साहेब,लातूर. डायटचे प्राचार्य श्री राजेंद्र गिरी साहेब,लातूर पंचायत समितीचे नूतन गटशिक्षणाधिकारी श्री संजय पंचगल्ले साहेब,औसा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री गोविंद राठोड साहेब,प्राध्यापक तथा ओबीसी नेते श्री धनजंय बेडदे सर उपस्थित होते..
या कार्यक्रम प्रसंगी कर्मचाऱ्यापैकी श्री मच्छिंद्र गुरमे सर,श्री अशोक पांचाळ सर,श्री राम दावणकर सर श्री विजयकुमार पिनाटे सर,श्री लक्ष्मण दावणकर सर, श्री अनिल कुटवाड सर,श्री सत्यनारायण वडे सर श्री गोविंद कोलपुके,श्री परमेश्वर बालकुंदे सर ,श्री गोविंद भोसले सर,श्री ज्ञानेश्वर अंभगे सर,श्री जयप्रकाश जगदाळे सर,श्री रंगनाथ सगर सर,श्री बाळू सुडे सर,श्री दत्तात्रय  दापके सर,श्री एस.डी सुतार साहेब,श्रीमती संध्या चौधरी मॅडम,श्रीमती अनिता साखरे मॅडम आणि इतर शिक्षक मित्र मंडळ या सर्वाचा  महासंघाकडून सन्मान करण्यात आले.
या कार्यकमाचे प्रास्ताविक राज्य समन्वयक श्री विजयकुमार पिनाटे सर यानी केले.महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास अकनगिरे सर, प्राध्यापक श्री धनजंय बेडदे सर यानी मनोगत व्यक्त केले. तसेच अनेक मान्यवर पाहुण्यानी पण मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राज्य युवा उपाध्यक्ष श्री सुदर्शन बोराडे सर यानी केले.शेवटी आभार प्रदर्शन श्री सत्यनारायण वडे सर यानी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री श्रीनिवास अकनगिरे सर,श्री सुदर्शन बोराडे सर,श्री दिलीप पिनाटे सर, श्री विजय टाकेकर,श्री संजय क्षिरसागर या सर्वानी परिश्रम घेतले.कार्यक्रम एकंदरीत छान झाला.