*रस्ता मंजूर असूनही पंढरपूर नगरपरिषद तो रस्ता करत नसल्याने नागरीकांमधून नाराजी*
*
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या इसबावी उपनगर भागातील प्रभाग क्र.12 मधिल पुणेरोड ते विश्वशांती नगरकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून पुर्णता मंजूर असूनही पंढरपूर नगरपरिषद तो रस्ता करत नसल्याने नागरीकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
त्या रस्त्याची अत्यंत दैनिय अवस्था झाली असून रस्त्याची पुर्णता चाळण झाली असल्याने नागरिकांना त्या रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे. तर नागरीकांमधून तो रस्ता करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती अता तो रस्ता मंजूर असूनही का केला जात नाही याच कारण जरी अस्पष्ट असले तरी त्या रस्त्याचे काम गेल्या महिन्यापासून केवळ उद्घाटना अभावी रखडले गेले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तर महिन्याभरापासून केवळ उद्घाटना अभावी रस्त्याचे काम रखडले असेल परंतु त्यामुळे नागरीकांना याचा मोठ्या प्रमाणात ञास सहन करावा लागत आहे निदान अतातरी पंढरपूर नगरपरिषदेने या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.