*तुटपुंज्या मानधनावर राबतयेत कोतवाल कर्मचारीचे हात**पंढरपूर तालुका,मानधन वाढवून मिळण्याची अपेक्षा*
करकंब:-महसूल विभागाचा गावपातळीवर काम करणारा कर्मचारी म्हणून कोतवाल यांची ओळख आहे. परंतु तुटपुंज्या माणधनावरच कोतवालांचे हात राबत असून मानधन वाढवून मिळण्याची कोतवालांना लागली आहे
महसूल विभागाचे
कोणतेही काम असो सर्वप्रथम आठवण येते ती याच कोतवाल यांचीच. महिनाभर कामाचा ताण आणि महिना संपल्यावर घरी किरण्याची वानवा अशा अवस्थेत असलेल्या कोतवाल यांना अजूनही मानधन वाढीची अपेक्षा आहे.
इंग्रजांच्या काळापासून
कोतवाल हे पद अस्तित्वात आहे. गावपातळीवरील सर्व प्रकारची कामे याच कोतवालांमार्फत केली
महसुलाची कामे, निवडणुकीची कामे, तलाठ्यांच्या
हाताखालील कामे तसेच बीएलओ ची कामे ही सर्व कामे याच कोतवालांकडून केली जातात. यासाठी मिळणारे मानधन मात्र तुटपुंजे आहेत. गावामध्ये दवंडी पिटवणे, शेतकरी व संबंधीत विभागाच्या कर्मचाऱ्यांना नोटिसा देणे, शेतकऱ्यांकडील शेतसाऱ्याची वसुली करणे, महसूल गोळा करणे, जमीन सर्वेक्षणासाठी रक्कम घेऊन पावत्या तयार करणे, पीक पाहणी अहवाल तयार करणे, शासनाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, मयताच्या वारसांची खरी माहिती प्रशासनाला देणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मदत करणे, ई पीक नोंदणीचे कामकाज पाहणे,
पावसाळ्याच्या कालावधीत रात्रपाळीचे काम करणे, आणि अतिवृष्टीचा आढावा वरिष्ठांना देणे आदी कामांसाठी शासनातर्फे या कोतवालांना भत्ता सुद्धा दिला जातो. पण तो भत्ता या म्हणजे कोतवालांची
थट्टामस्करी असल्याचे मत सर्वस्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.
~~~~~~~~~~~
मागील 13 वर्षांपासून 45 वयाच्या आतील कोतवालांची शिपाई कर्मचारी म्हणून पदोन्नती करण्याचा निर्णय झाला असला तरी अद्यापपर्यंत आम्हाला पदोन्नती मिळाली नाही त्यामुळे शासन निर्णयानुसार 45 वयाच्या पुढे गेलेल्या कोतवालांना पदोन्नती पासून मुकावे लागत असून त्याच्या परिणाम त्यांच्या रोजीरोटीवर होत आहे
~~~~~~~~~~~
आम्हाला शिपाई व क्लार्कची कामे करावी लागत आहे त्यामुळे शासनाने आम्हाला चतुर्थश्रेणीचा पगार द्यावा
अनिल जाधव
जिल्हा सरचिटणीस
कोतवाल संघटना