*सासराच बनला सुनेसाठी नराधम* *सुनेला करू लागला ब्लॅकमेल* *सुनेने केली पोलिसांत तक्रार*
पंढरपूर /प्रतिनिधी
सुनेचे स्नान करतानाचे चित्रीकरण करून, सुनेस ब्लॅकमेल करणारा सासरा पंढरपूर तालुक्यात पहावयास मिळाला आहे . याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात सुनेनेच दिल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर तालुक्यातील एका अक्कलशुन्य सासरे आणि त्याचे खरे रूप दाखवले आहे .स्वतःच्या सुनेच्या अंगावर हात टाकण्याचा प्रकार त्याने दोन आठवड्यापूर्वी केला होता. पतीने सारवासारव केल्याने घडलेल्या प्रकारावर कोणतीही वाच्छता झाली नव्हती. परंतु या प्रकाराने या नराधम सासर्याचे मनोबल अधिक उंचावले होते.

एके दिवशी सून स्नानगृहात स्नान करीत असताना, त्याने नकळत तिचे चित्रीकरण केले .आणि हेच चित्रीकरण तिला दाखवून ब्लॅकमेल करू लागला. माझ्या मुलापासून तुला अपत्य होणार नाही, यासाठी तू माझ्या बरोबर संबंध ठेव, नाहीतर मी हे चित्रीकरण व्हायरल करीन ,अशी धमकी देऊ लागला . या धमकीनंतर संबंधित सुनेने फोन करायचा आहे असे सांगून, त्याचा मोबाईल स्वतःकडे घेतला . त्या मोबाईल मधील चित्रीकरणाची खात्री केली . हे चित्रीकरण तिने स्वतःच्या भावास पाठवले ,आणि तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. माहेरी गेल्यानंतर तिने घडलेला प्रकार आईस सांगितला, आणि माहेरच्या मंडळीसह सोमवारी तिने पंढरपूरचे पोलिस ठाणे गाठले. पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात या नराधम सासर्याविरोधात तिने तक्रार दिली . तक्रार देताच या नराधम सासर्यास तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महिला घराबाहेरच नाही तर घरातही सुरक्षित नाही, हे पंढरपूर तालुक्यात घडलेल्या या प्रकाराने दाखवून दिले आहे. वडिलांसमान असणारा सासराच जर सुनेसाठी नराधम बनला, तर ही महिला घरातही सुरक्षित नाही, असेच या प्रकारातून दिसून येत आहे.
चौकट
सासर्याने सुनेला ब्लॅकमेल करून त्रास दिल्याची घटना पंढरपूर तालुक्यात घडली आहे. याबाबत पीडित सुनेकडून पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे महिला घराबाहेर सुरक्षित नाही तर घरातही सुरक्षित नसल्याची साक्ष या घटनेने दिली आहे