*करकंब पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना आवाहन*.

*करकंब पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना आवाहन*.

*करकंब /प्रतिनिधी*

करकंब व करकंब पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी सावध राहून कोणीही अनोळखी इसम येऊन भारत गॅस चा टी शर्ट घालून गॅस दुरुस्ती करतो असे सांगून घरात येऊन स्त्रियांच्या अंगावरील दागिने चोरून घेऊन  जातो. तरी अशा अनोळखी इसमास कोणीही घरात घेऊ नये. तत्काळ घरातील व्यक्तींशी त्वरित संपर्क करून अथवा शेजाऱ्यांशी संपर्क साधावा. व याबाबत पोलिसांना त्वरित कळवावे. तसेच सोने पॉलिश करून देतो असा विश्वास संपादन करून घरामध्ये घेऊन नजरचुकीने फसवणूक करून अनोळखी व्यक्ती आपले कडील असलेले ओरिजिनल सोने घेऊन पसार होते. नागरिकांनी कोणताही आर्थिक व्यवहार वा खरेदी विक्री मधून मिळालेले पैसे घरात न ठेवता लवकरात लवकर बँकेत जमा करावे.* 
*सध्या भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून कडून पोलिसांकडून  योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.तरी देखील नागरिकांनीही योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. तरी नागरिकांना अनोळखी इसमा बाबत संशय आल्यास करकंब पोलीस ठाणे च्या पोलीस अधिकारी यांचे मोबाईल नंबर-सपोनि निलेश तारु-8652020008,,पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे ,,9004220002 ,, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे-8275265394 या वरती संपर्क साधून कळवावे. करकंब व करकंब पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी अनोळखी इसमापासून सावध राहण्याचे आवाहन करकंब पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपोनि निलेश तारु यांनी केले आहे.*