*स्वराज साखर कारखाना सोलापूर जिल्हातील शेतकऱ्यांना उच्चांकी दर देणारा पहिला कारखाना*  *अँड जिजामाला नाईक निंबाळकर यांची गावभेटी दरम्यान सांगितली माहिती* 

*स्वराज साखर कारखाना सोलापूर जिल्हातील शेतकऱ्यांना उच्चांकी दर देणारा पहिला कारखाना*   *अँड जिजामाला नाईक निंबाळकर यांची गावभेटी दरम्यान सांगितली माहिती* 

पंढरपूर/प्रतिनीधी 

.फलटण तालुक्यातील  स्वराज साखर कारखान्याचे वतीने  सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा या भागातील शेतकर्यांचा ऊस आणला जातो . शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याची वाटचाल सुरू आहे .यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा कारखान्याने ४.लाख ८२ हजार गाळप केले आहे .या भागातील सर्वात जास्त म्हणजे ३१०१/- दर देणारा कारखाना म्हणून नोंद झाली आहे. अशी माहिती अँड जिजामाला नाईक निंबाळकर यांनी दिली .

 फलटण भागातील गावदौरे सुरू आहेत. यावेळी शेतकऱ्यांना माहिती देताना वरील माहिती सांगितली पुढे बोलताना त्या म्हणाल्या की खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी तालुक्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प मार्गी लावलेले आहेत . त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा नीरा देवधरच्या पाणी प्रकल्पातून सांगोला ,माळशिरस ,फलटण ,या परिसरातील शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे .त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा फायदा होणार आहे . संपूर्ण शेती ही पाण्याखाली येणार आहे. भविष्यात उसाचे पीक हे मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर ,युवक, यांना रोजगार उपलब्ध होणार आहे.व यांचा फायदा तालुक्यातील अर्थकारण बळकट होण्यासाठी मदतच होईल . असेही अँड जिजामाला नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे.