*शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजाराची मदत करा* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी*

*शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजाराची मदत करा*  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी*

पंढरपूर : प्रतिनिधी 

संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे न करता सरसकट एकरी पन्नास हजार रुपयाची तातडीची मदत देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी मुंबई येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच नद्यांना,वड्यांना पूर आला असून पूर्ण पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांची घरे देखील पाण्यात गेली आहेत. अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
हातात तोंडाशी आलेली शेतातील उभी पिके उध्वस्त झाली असून शेतकरी हवालदिल होऊन चिंताग्रस्त बनला आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मदतीची गरज असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे न करता सरसकट सर्व शेतकऱ्यांना तातडीची किमान एकरी ५० हजाराची मदत  द्यावी अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे.
 यावेळी छत्रपती संभाजी नगरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर,परभणीचे जिल्हाध्यक्ष शेखराज, विनोद मस्के इत्यादी उपस्थित होते.