*सोशल मीडियावर कितीही होऊ द्या आदळआपट !* *शहाजी बापूच  अजनही आमदार फीट ...*  *कोळी समाजाचे नेते समाजसेवक अरुणभाऊ कोळी यांचा भक्कम विश्वास*

*सोशल मीडियावर कितीही होऊ द्या आदळआपट !*  *शहाजी बापूच  अजनही आमदार फीट ...*   *कोळी समाजाचे नेते समाजसेवक अरुणभाऊ कोळी यांचा भक्कम विश्वास*

पंढरपूर (प्रतिनिधी)
 
सांगोला विधानसभा निवडणुकीने सबंध 
राज्यात खळबळ उडवून दिली आहे. आ. शहाजीबापू पाटील यांचा पाडाव करण्यासाठी अनेक राजकीय शक्ती झटत आहेत. परंतु आपल्या रांगड्या स्वभावामुळे 
शहाजीबापू पाटील 
यांची समाजमनावर जोरदार पकड आहे. 
याची साक्ष पंढरपूरमधील कोळी समाजाचे नेते समाजसेवक 
अरुणभाऊ कोळी यांच्या वक्तव्याने दिली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे सांगोल्याचे आ. शहाजीबापू पाटील हे
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रडारवर आहेत. यामुळेच सांगोल्यात दीपक साळुंखे 
यांना शिवसेनेत घेऊन, 
शहाजीबापूंना शह देण्याचा प्रयत्न होत आहे. 
आ. शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात 
सोशल मीडियातून अपप्रचारही होत आहे.

या सर्व परिस्थितीचा नागरिकांच्या मनावर प्रभाव तर होणारच नाही, 
उलट आ. शहाजीबापू पाटील हे आकर्षण केंद्र बनले आहेत. या सर्व प्रकाराची दखल घेऊन, 
सोशल मीडियावर पंढरपूरचे समाजसेवक अरुण कोळी यांनी धगधगती प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया त्यांची नसून , शहाजी बापू पाटील यांच्या पाठीशी असणाऱ्या प्रत्येक मतदाराची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

आ. शहाजीबापू पाटील हे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्यानंतर सांगोला तालुक्याला लाभलेले कणखर नेतृत्व आहे. रांगडा स्वभाव,
गावठी वक्तृत्व, सखोल अभ्यास यांनी परिपूर्ण असलेल्या शहाजीबापूंची 
नागरिकांच्या मनावर मोठी पकड आहे. या तिहेरी निवडणुकीच्या रणांगणात 
शहाजीबापू बाजी मारणार असल्याची प्रतिक्रिया, समाजसेवक अरुण कोळी यांच्यासह अनेक नागरिक देऊ लागले आहेत.