*शिवसेनेचे युवा नेतृत्व भाई नितीन काळे यांच्या  वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव..!* *विविध शाळेतील विद्यार्थ्यांना केले शालेय साहित्याचे वाटप*

*शिवसेनेचे युवा नेतृत्व भाई नितीन काळे यांच्या  वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव..!*  *विविध शाळेतील विद्यार्थ्यांना केले शालेय साहित्याचे वाटप*

पंढरपूर/प्रतिनिधी 

 शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख
भाई नितीन काळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. विविध मान्यवरांसह मित्र परिवाराच्या वतीने  मीडियावर आणि समक्ष भेटून   शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवसानिमित पंढरपूर तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले.

 तालुक्यातील पुळूज जिल्हा परिषद शाळेत सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी भाई नितीन काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोहन खरात, पुळूज विविध कार्यकारी सोसायटीचे ‌संचालक राजू बाबर, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ वाघमोडे, प्रगतशील बागायतदार अनिल गावडे, अक्षय कसबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे,केंद्रप्रमुख सिद्धेश्वर भोई,मुख्याध्यापक तुकाराम गायकवाड, शिक्षक विठ्ठलराव टाकळे, पवार सर, माडे सर, राठोड सर, साबळे सर, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक, मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते. शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

पंढरपूर तालुक्यातील एक उमलते नेतृत्व,
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक ,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ अग्रेसर असलेले सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजबरोबर सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे. त्यांनी आजवर अनेक लोकोपयोगी कामे मार्गी लावली आहेत. यापैकी गोरगरीब धनगर समाजातील 
लोकांना काचे घर मिळावे म्हणून,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतुन सोलापूर जिल्ह्यातील 1800 घरकुल मंजुर करण्यासाठी  प्रयत्न केले . मंत्रालय स्तरावर अनेक वेळा हेलपाटे मारून गोरगरिबांच्या घराचा प्रश्न अखेर मार्गे लावण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यामुळे गोरगरीब धनगर समाजाच्या घराघरात भाई नितीन काळे यांचे नाव हृदयात कोरले गेले आहे.

*चौकट* 

*मंत्री, खासदार अन् आमदाराकडूनही  शुभेच्छा..!*
➖➖➖➖➖
भाई नितीन काळे यांच्या वाढदिवसानिमित उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी तर काल बुधवारीच शुभेच्या दिल्या होत्या. त्याबरोबरच  अनेक मंत्री, आजी माजी खासदार आणि आमदारांसह विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आवर्जून भाई नितीन काळे यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. आपल्या वाढदिवसानिमित्त आपणासाठी ज्या काही शुभेच्छा आल्या आहेत. ते मिळवलेली माणुसकी आणि त्याचे फलित असल्याची प्रतिक्रिया भाई नितीन काळे यांनी दिली आहे.