*मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी सिंदखेड राजा येथील माँसाहेब जिजाऊंना केले अभिवादन*
पंढरपूर/प्रतिनिधी
सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे जावून मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी राजमाता,राष्ट्रमाता,माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सव सोहळा याठिकाणी भेट दिली. माँसाहेब जिजाऊच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेशभैया डोंगरे पाटील,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणीचे जिल्हाध्यक्ष गणेशसुरवसेपाटील,जिल्हाध्यक्ष शेखराज,बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवा पुरंदरे,महेंद्र पवार, आकाश राजे जाधव इत्यादी उपस्थित होते.

यावेळी या जन्मसोसोहळ्यात दर्शनासाठी आलेल्या शिवप्रेमीना महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले.