*वाखरी गटात मोनिकाताई काळेंना महिला शक्तीचा पाठिंबा* *वाडीकुरोलीत हजारों महिलांचा स्नेहमेळावा*
पंढरपूर /प्रतिनिधी
मकर संक्रांतीनिमित्त वाडीकुरोली येथे राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य परिवाराचे कुटुंबप्रमुख श्री.कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हुरडा पार्टी, स्नेहमेळावा व ‘सन्मान नारी शक्तीचा’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सहकार शिरोमणी वसंतदादांचा सामाजिक वारसा अखंडपणे पुढे चालू ठेवत असताना नेहमी परिवारातील पुरुष मंडळींचे अनेक कार्यक्रम होत असतात यावेळी मकर संक्रांतीच्या मंगल पर्वावर घर ,संसार ,कुटुंब आणि जबाबदाऱ्यात गुंतलेल्या माता-भगिनी यांना थोडा वेळ स्वतःसाठी मनमोकळ्या आनंदासाठी आणि एकमेकांशी जोडण्यासाठी मिळावा या हळव्या, आपुलकीच्या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चार तास आपल्या कौटुंबिक ताणतणाव विसरून या कार्यक्रमात महिलांनी मनमुराद आनंद घेतला.
यावेळी उपस्थित महिलांनी हा केवळ हुरड्याचा आस्वाद नव्हता तर आपुलकी सन्मान विश्वास आणि नात्यांचा उद्धार स्पर्श देणारा हा आनंददायी क्षण आमच्या आयुष्यात या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने मनात घर करून गेला अशी प्रतिक्रिया दिली.
श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सौ.संगीताताई काळे सौ. जयश्रीताई काळे व जिल्हा परिषद वाखरी गटातून निवडणूक लढवणार असलेल्या मोनिकाताई काळे यांनी उपस्थित महिलांचे मनोभावे स्वागत केले.
या कार्यक्रमास कुटुंबप्रमुख आईसाहेब मालनकाकू काळे व सुमनकाकू काळे आवर्जून उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला हजारो महिला माता-भगिनींची अभूतपूर्व उपस्थिती लाभली.
महिलांनी एकमुखाने “काळे कुटुंब आमचा विश्वास आणि परिवार आहे, आम्ही कायम या कुटुंबासोबत आहोत” असा ठाम निर्धार व्यक्त करत मोनिकाताई काळेंना पाठिंबा दिला.
महिलांच्या सन्मानाचा, संस्कृतीचा आणि सक्षमीकरणाचा जागर करणारा आनंददायी कार्यक्रम राहुल नवनाथ राजे यांनी यावेळी सादर केला.
यावेळी बोलताना संगीताताई काळे म्हणाल्या की सामाजिक कार्य करत असताना आपल्या माणसाची साथ प्रोत्साहन आणि भक्कम आधार हवा असतो आपण कुटुंबातील माता-भगिनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद वाढवला हीच साथ सदैव सोबत राहावे असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले
मोनिकाताई काळे यांनी उपस्थित सर्व माता-भगिनींचे आभार मानत सहकार शिरोमणी दादांची सून म्हणून तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी येणार आहे तोच दादांचा वसा आणि वारसा कायम पुढे चालू ठेवीन हा आशावाद व्यक्त केला.
उपस्थित विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना मकर संक्रातीनिमित्त काळे परिवाराच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.