*त्या एसटीच्या वाहकावर कारवाई करा* *आ .समाधान आवताडे यांची विभागीय वाहतूक अधिकाऱ्याकडे मागणी*
पंढरपूर/ प्रतिनिधी
राज्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने विविध योजना राबवल्या

जात आहेत. विविध प्रकारच्या लोकांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बाबतीत गोरगरीब जनता समाधानी होती. मात्र मंगळवेढा आगारातील एका वाहकाने शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यावर आपली शिस्त दाखवण्याचा प्रयत्न केला. ती शिस्त नसून माणुसकीच्या बाहेरचं जगणं असेच सिद्ध झालं आहे. त्यामुळे त्या वाहका विरोधात सामान्य नागरीकातून उद्रेक व्यक्त केला जात आहे. अशातच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनीही, या घडलेल्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत, त्या वाघाच्या विरोधात चौकशी करून कारवाई करावी असा लेखी आदेश , राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी यांना दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती आशी आहे की, मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील प्रथमेश राहुल पाटील हा इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे. दररोज तू मंगळवेढा येथे शाळेसाठी येत होता. क्या करिता एसटीचा सवलतीचा पासही त्याच्याकडे होता. शनिवारी त्याचा पास घरी विसरून तो शाळेत आला होता. बस क्रमांक ९४०५मधून शनिवारी मंगळवेढ्यातून सोलापूर बसने ब्रह्मपुरी या आपल्या गावी बस मधून निघाला होता. सायंकाळी ५वाजता हा प्रकार सुरू होता.
बसमधील वाहकाने तिकीट काढण्यासाठी त्या चिमुकल्याला मागणी केली. त्या चिमुकल्याने आपला पास घरी विसरण्याची कबुली देत माझ्या वडिलांना आपण फोन करावा ते पैसे देतील, अशी विनंती केली होती. त्या निगरगट्टा मनाच्या वाहकाने त्या चिमुकल्याच्या कोवळ्या वयाचाही विचार केला नव्हता. त्याने थेट रस्त्यातच बेल वाजवून बस थांबून त्या चिमुकल्याला रस्त्यावर सोडून दिले होते. सदरची बाब गंभीर होती. एवढा मोठा प्रकार घडत असताना बसमधील प्रवाशांनीही आपली दानत न दाखवता त्या वाहकाला कोणीही सांगण्याचा प्रयत्न का केला नसेल? हा प्रश्न घडलेल्या गंभीर प्रकारानंतर सर्वांना पडू लागला आहे. रस्त्यावर सोडलेल्या त्या चिमुकल्याला एका दुचाकी स्वाराने त्याच्या घरी सोडून घडला प्रकार सांगितला आहे.
सदर घडलेला प्रकार हा माणुसकीला काळीमा फासणारा असून गंभीर स्वरूपाचा आहे ही बाब आमदार समाधान आवताडे यांनी मनावर घेतली असून यातील खरी चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी केली आहे.