*महादेव मंदिराच्या ५१ फुट शिखराचे भूमिपूजन* *ईश्वर वठारमध्ये लोकवर्गणीतून होणार महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार*
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील महादेव मंदिराच्या मंदिराचा आणि शिखराचा भूमिपूजन सरपंच नारायण देशमुख यांच्या हस्ते पार पडले. विधान परिषदेचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्या फंडातून या मंदिरासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या ठिकाणी लोक वर्गणी काढूनही भव्य असा निर्णोद्धार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रम प्रसंगी गावातील अनेकांनी आपली देणगी जाहीर केली आहे. यामुळे गावातील ग्रामदैवत असलेले महादेव मंदिर एक वर्षात पूर्ण केले जाईल. असा निर्धार ईश्वर वटार येथील ग्रामस्थांनी केला आहे.
यावेळी सरपंच नारायण देशमुख उपसरपंच अण्णासाहेब मेटकरी, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन घोडके भारत पांढरे पंकज देवकते, सदाशिव मेटकरी, ज्ञानेश्वर गुंडगे,बाळासाहेब खांडेकर, प्रल्हाद लवटे, आकाश बोरकर,नवनाथ सरवदे, गोरख सरवदे, अंकुश सरवदे, बंडू लवटे ,सोनू बोरकर, रामभाऊ हळणवर, मोहन मिटकरी, हनुमंत लवटे, म्हाळप्पा खांडेकर, दगडू देशमुख राम तरंगे अनंता चौगुले, यशवंत बंडगर आप्पासो बंडगर महादेव धुपे बंडू खांडेकर , हनुमंत खरात ,अशोक तरंगे, लक्ष्मण खांडेकर दादा देशमुख, आधी सह सर्व ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते