*बार्डी येथील मुख्याध्यापक कालिदास कवडे सर यांना सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार....!* *सोलापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न.*
करकंब/ प्रतिनिधी :-
सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक
संघाचा 2022 -23 चा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष, जि प सदस्य- .सुभाषराव माने सर ,शिक्षण उपसंचालक विकास गरड , सोलापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी . बाबर तसेच प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार व सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांच्या हस्ते विद्यानंद माध्यमिक विद्यालय बार्डी .शाळेतील मुख्याध्यापक कालिदास गणपत कवडे सर यांना देण्यात आला . यावेळी हा पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे संस्थापक दिनकर दादा कवडे तसेच बार्डी गावचे सरपंच अभिजीत (भैय्या ) कवडे तसेच शिक्षक वृंद अदि उपस्थित होते. हा पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे संपन्न झाला.