*करकंब ट्राफीक पोलीसांनी सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या* *घरफोडी - दरोडे च्या प्रयत्नात असलेल्या सराईत गुन्हेगारावर ट्राफिक पोलिसांची करडी नजर.*
करकंब/ प्रतिनिधी :-
मा.पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधिक्षक -हिंमत जाधव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर विभाग विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाणेची हददीमध्ये बेकायदेशीर रित्या फिरणारे गुन्हेगार यांचेवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले होते.
करकंब पोलीस ठाणेकडील ट्राफीक पोलीस अंमलदार पोलीस हवालदार/गोरवे व पोलीस नाईक/इनामदार हे दोघे दिनांक 30/11/2022 रोजी वाहतुक केसेस करीता एन एच 561 अ मार्गावर कारवाई करीत होते. त्यांना गुप्त बातमीदार मार्फतिने माहीती मिळाली की, जळोली चैक येथे हायवेवर तिन इसम संशयास्पदरित्या हत्यारे घेवुन मोठा गुन्हा करण्याचे उददेषाने फिरत आहेत. त्यानुसार प्रसंगावधान दाखवुन पोहवा/गोरवे यांनी लगेच दोन पंचाना बोलावुन थोडक्यात हकीकत सांगुन पंचासह करकंब चैक ते जळोली चैक पेट्रोलींग करीत असताना अराध्ये पेट्रोलपंप समोर आले असता ट्रिपल सिट फिरणारे तिन इसमांना थांबवुन त्यांची चैकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देवुन नाव व पत्ता सांगणेस नकार दिला असता त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेजवळ गुप्ती, चाकु सारखे हत्यार व पाकीटामध्ये ब्लेडची पाकीटे मिळुन आली.सदरचे हत्यारे व ब्लेड जवळ बाळगण्याचे कारण विचारले असता काहीही सांगीतले नाही.सदरच्या मोटार सायकल हिरो कंपनीची आय स्मार्ट पांढरी काळया रंगाची आरटीओ नंबर मोटार सायकल एम एच 23 ए पी 1662 असा असुन त्यांचे नावे विचारणा केली असता त्यांनी त्यांची नावे 1)प्रदिप उर्फ विजु संभाजी काळे,वय-22 वर्शे रा.सावरगाव ता.माजलगाव जि.बिड 2) फिरोज संदिप चव्हाण, वय-26 वर्शे, रा.षेरी बुद्रक ता.आश्टी जि.बिड व 3) सनिदेव उर्फ बाळु हरी भोसले वय -35 वर्शे रा.सावरगाव पोस्टे मंगरुळ ता.माजलगाव जि.बिड असे सांगीतले. सदरचे इसम हे बीड जिल्हयातुन हत्यारे घेवुन संषयास्पद गंभीर गुन्हे करण्याचे उददेषाने जाताना मिळुन आल्याने आम्ही त्यास जागीच पकडले आहे.सदरच्या आरोपीवर यापुर्वी घरफोडी व दरोडासारखे गंभीर गुन्हे दाखल असुन करकंब पोलीस ठाणेस गु.र.नं.417/2022 भारतिय हत्यार अधिनियम कलम 4,25 सह मोटार वाहन कायदा कलम 3(1)/181,128(1)/194(सी)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरच्या गुन्हयातील तिन्ही आरोपींना आज न्यायालयामध्ये तपासी अंमलदार पोना/अभिजित कांबळे यांनी हजर केलेले आहे.सदरच्या ट्राफीक पोलीसांची हायवेवरील करडया नजरेमुळेच सराईत गुन्हेगार पकडण्यात यश आलेले आहे.
सदरच्या कामगीरी सपोनि निलेश तारु यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरु असुन पोउपनि - महेश मुंढे,पोउपनि -अजित मोरे, पोहवा/959 गोरवे,पोहवा/1897 जाधव,पोना/903 कांबळे, पोना/1163 इनामदार, पोकाॅ/2007 घुगे यांनी केलेली आहे.