*करकंब येथे एकलव्य अभ्यासिकेचा शुभारंभ....!*
करकंब प्रतिनिधी
:- करकंब सारख्या ग्रामीण भागातील एमपीएससी, युपीएससी आणि विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी करकंब येथे अद्ययावत अशी एकलव्य अभ्यासिकेचा शुभारंभ दिनांक रविवार १८ जून रोजी सकाळी ९:३०वा. सोमवार पेठ येथील मोती चौक जूनी स्टेटबॅक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी- दिलीप स्वामी, शिक्षण उपसंचालक- महेशज चोथे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी- संजय जावीर ,सोमनाथ रसाळ.(उप मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग गटविकास अधिकारी-प्रशांत काळे गीतांजली टकले, (पोलीस अधीक्षक धाराशीव) अस्मिता शिंदे,(नुतन उपविभागीय पोलिस अधिकारी)अमृता देशमुख,(परिवहन अधिकारी) .गणेश देवकते,(पी.एस.आय.)वि,ग.जोशी (सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक,) सरपंच-तेजमाला पांढरे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा उपसरपंच आदिनाथ देशमुख,विरोधी पक्ष नेते-राहुल काका पूरवत, मा.जि.प.सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते आणि उपस्थितीत होणार असून करकंब व करकंब पंचक्रोशीतील सर्व होतकरू विद्यार्थी आणि जागरूक पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन एकलव्य अभ्यासिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
अनेक विद्यार्थी मोठमोठ्या शहरांमध्ये अभ्यासिका आहेत तेथील अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करतात, परंतु ग्रामीण भागातही अशी अभ्यासिका होण्यासाठी काही तरुण मंडळींची मनापासून इच्छा होती.आणि त्या दृष्टीने प्रयत्न ही होत होता.आता ती इच्छा प्रत्यक्ष साकारत आहे,आता शहरात न जाता आपल्या गावातच अद्यावत अशी अभ्यासिका होत असून या अभ्यासिकेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी एडव्हॉन्स पुस्तके उपलब्ध होणार आहेत,तसेच विद्यार्थ्यांना एकदोन महिन्यातून युपीएससी एमपीएससी यशस्वी अधिकाऱ्यांचे अनमोल करिअर मार्गदर्शन ही मिळणार आहे.जेणेकरुन या अभ्यासिकेचा फायदा भविष्यकाळासाठी अधिकारी होण्यासाठी होणार आहे.तरी एकलव्य अभ्यासिकेचा करकंब व करकंब पंचक्रोशीतील सर्व होतकरू विद्यार्थ्यांनी या एकलव्य अभ्यासिकेचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष रघुनाथ जाधव , उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे, हरिश्चंद्र वास्ते, सचिव पांडुरंग काटवटे, सहसचिव प्रमोद रेडे पाटील खजिनदार राजेंद्र करपे, सदस्य हरिश्चंद्र वास्ते, संतोष भोसले सल्लागार अजीत जव्हेरी यांनी केले आहे.लेकीच झाड टीम जागर टीम आणि तरूण वर्ग कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिक परिश्रम घेत आहेत.