*पंढरीत विदयार्थ्यांसाठी मोफत योग वर्गाचे  आयोजन* *१९मार्च ते २१मार्च पर्यंत योग विद्या धाम पंढरपूरच्या  चालणार ऑनलाइन योग प्रशिक्षण* *योग शिक्षिका सौ प्रिया विभूते यांची माहिती*

*पंढरीत विदयार्थ्यांसाठी मोफत योग वर्गाचे  आयोजन*  *१९मार्च ते २१मार्च पर्यंत योग विद्या धाम पंढरपूरच्या  चालणार ऑनलाइन योग प्रशिक्षण*  *योग शिक्षिका सौ प्रिया विभूते यांची माहिती*

पंढरपूर/प्रतिनिधी
कोरोनाच्या  कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना फारसा ताण निर्माण होत नव्हता. सध्या शाळा सुरू झालेल्या आहेत. यामुळे बरेच दिवस विसावलेल्या विद्यार्थी यांना आता परत एकदा शाळा आणि शिकवणीने तणाव निर्माण होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्यासाठी योग विद्या धाम च्या वतीने  शनिवार दि १९ मार्च ते२१मार्च या तीन दिवसांमध्ये मोफत योग वर्ग घेण्यात येणार असल्याची माहिती योग शिक्षिका सौ प्रिया विभूते यांनी दिली आहे. 
या सुरू झालेल्या शाळा मुळे आता परीक्षा ही ऑफलाईन होणार हे नक्की आहे. त्यामुळे विद्यार्थी तणाव आणि स्ट्रेस वाढला आहे. हा दूर व्हावा यासाठी सूर्यनमस्कार, ओंकार साधना, योग निद्रा, आदी शिबिरामध्ये घेण्यात येणार आहेत.
या शिबिरासाठी तीन दिवस संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत ऑनलाइन शिबीर घेण्यात येणार आहे. तरी यामध्ये समावेश होणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लिंक द्यावी लागणार आहे. यामुळे वय वर्ष7सात ते अठरा वयोगटातील  विद्यार्थी आणि  विद्यार्थिनी यांनी त्वरित  माझ्या मोबाईल नंबर ९५२७८५६१२५ वरती सम्पर्क साधून, या मोफत योग शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही सौ प्रिया विभूते यांनी केले आहे.