*जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य पदी प्रियांका परांडे यांची निवड*

*जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य पदी प्रियांका परांडे यांची निवड*

पंढरपूर/प्रतिनिधी 

गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात तसेच ग्राहक संघटनेच्या माध्यमातून केलेले कार्य तसेच विविध सामाजिक उपक्रमातील योगदान कार्य याची दखल घेऊन प्रियांका परांडे यांची “जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद” या समिती मध्ये उद्योग व व्यापार या क्षेत्रा मधून अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. 
 उद्योग व व्यापार  क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची निवड ग्राहक संरक्षण परिषद  केली जाते. प्रियांका परांडे यांच्या या 
निवडीमुळे, या क्षेत्रातील समस्या आणि गरजा प्रभावीपणे परिषदेसमोर मांडल्या जाऊ शकतात.
या सदस्यांमुळे, ग्राहकांना चांगली सेवा आणि न्याय मिळवून देण्यासाठी एक मजबूत आधार मिळेल, अशी भावना सर्व सामान्यांमधून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.