*इलेक्ट्रिक मोटार चोरणाऱ्या चोरास ग्रामस्थांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात*

*इलेक्ट्रिक मोटार चोरणाऱ्या चोरास ग्रामस्थांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात*

करकंब /प्रतिनिधी :

जळोली ता . पंढरपूर येथील बाळू भीमराव चव्हाण यांच्या शेतातील विहिरीवरील बसवलेली इलेक्ट्रिक मोटार चोरून घेऊन जात असताना जळोली व सांगवी गावातील लोकांनीमोटार चोरास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळोली येथील राहणारे बाळू भीमराव चव्हाण. यांचे शेतामध्ये विहिरीवर पिकांना पाणी देण्यासाठी बसवण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटार दिनांक 17/9/2022 रोजी रात्रीच्या सुमारास चोरून  फॅशन प्रो या मोटरसायकलवर घेऊन जात असताना जळोली व सांगवी गावातील लोकांनी या इलेक्ट्रिक मोटार चोरणाऱ्या चोरास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची फिर्याद बाळू भीमराव चव्हाण यांनी करकंब पोलीस स्टेशन येथे दिली. असून  कृष्णा मच्छिंद्र रुपनर याचेवर करकंब पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम 379, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे. बालाजी घोळवे, पोलीस हे.टी.ए.सलगर, पोलीस हे. पी.एम. शेटे, पोलीस नाईक दयानंद हजारे, खांडेकर, घुगेअदि करीत आहेत.