*पंढरपुरात पुणे विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन.* *माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन*

*पंढरपुरात पुणे विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन.*  *माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन*

पंढरपूर /प्रतिनिधी

पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवारी पुणे विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर, पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
याप्रसंगी उपप्राचार्य चांगदेव कांबळे, पांडुरंग कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे, संचालक हरीशदादा गायकवाड उपस्थित होते.
आलेल्या मान्यवरांचे स्वागत सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन ताराळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुभाष मस्के यांनी केली. सूत्रसंचालन राजेश धोकटे यांनी केले तर आभार गणेश पवार यांनी मानले.
यावेळी राजू प्यारी, आंतरराष्ट्रीय पंच चंद्रकांत पाटील व क्रीडा स्पर्धेसाठी परिश्रम घेणाऱ्या प्रशिक्षकांचा सत्कार माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे यांच्या हस्ते करण्यात आला.
या स्पर्धेत यश संपादन केलेल्या स्पर्धकांची निवड राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी होणार आहे.
पंढरपूर येथील पुणे विभागीय स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेले पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर आणि सोलापूर या ३ जिल्ह्यातून तसेच ७ विभागातून १,६२० स्पर्धक सहभागी झाले आहेत.
यामध्ये १४, १७ आणि १९ वयोगटातील मुला मुलींचा सहभाग असून यामध्ये रनिंग, गोळा फेक, थाळी फेक, उंच उडी यास ११ प्रकारचे क्रीडा प्रकार आहेत. 
सदरची स्पर्धा दोन दिवस चालणार आहे.
स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रा. सुभाष मस्के, गजेंद्र पवार, चेतन धनवडे, गणेश बागल, आबा नवले, शिंदे सर, सूर्याजी लिगडे,आदी परिश्रम घेत आहे