*करकंब येथील रामभाऊजोशी हायस्कूल येथे जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा* *स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन*

*करकंब येथील रामभाऊजोशी हायस्कूल येथे जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा*  *स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन*

करकंब/  प्रतिनिधी :-
    दयानंद शिक्षण संस्थेच्या करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल व डी.ए.व्ही. महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्यु. काॅलेज येथे जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.


     यावेळी सोलापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक शाखा करकंब येथील महीला बँक अधिकारी सौ.प्रिती माने-देशमुख या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रशालेतील महीला कर्मचारी सौ.मनिषा ढोबळे,सौ.वंदना म्हेत्रे,सौ ज्योती पवार,कु.आश्वीनी शिंगटे,सौ.उमा उत्पात, श्रीमती संगीता काळे यांचा सत्कार करण्यात आले.
     या महीला दिनानिमित प्रशालेत भाषण स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या.यावेळी प्रशालेतील स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी, मनिषा ढोबळे यांनी आपले विचार व्यक्त केले.
        प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम,पर्यवेक्षक धनवंत करळे, स्काऊट शिक्षक महादेव पुजारी यांच्या मार्गदर्शनाने सुंदर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यी उपस्थित होते.